महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘दिव्यांगासाठी साहस संस्था मोलाचे कार्य करत आहे. या संस्थेला होस्टेलसह अन्य गोष्टीसाठी मदत करू ’अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
साहस डीएसबिलीट रिसर्च अँड केअर फाउंडेशनच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम मंत्री पाटील बोलत होते. जागतिक अपंग
दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. व्हीलचेअर वाटप केले.
दिव्यांगांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या वंदना अग्रवाल यांना ‘साहस रोल मॉडेल २०२२’हा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी प्रीती पटवा,
देवदत्त माने, सागर भोकरे यांचा सत्कार झाला. कर्णबधिर मृणाल भोईला शिष्यवृत्ती दिली.
संस्थेच्या नसिमा हुजरुक यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव व माई ह्युंडाईचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे, विश्वस्त साताराम
पाटील, अजिज हुरजूक, सीए कृष्णात पाटील, अय्याज संगराज आदी उपस्थित होते.