महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी बुधवारी डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावडाच्या विद्यार्थ्यांशी आगामी ‘वेड’ या चित्रपटातील गाण्यावर ठेका धरत संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनीही जल्लोष करत त्यांच्यासोबत सेल्फी काढल्या. या जोडीने आपल्या संवाद व नृत्यातून डी. वाय. पाटील ग्रुपच्या विद्यार्थ्याना ‘वेड’ लावले.
रितेश देशमुख दिग्दर्शित करीत असलेल्या व त्याची पत्नी जेनेलिया निर्माती असलेला ‘वेड’ हा मराठी चित्रपट 30 डिसेंबर पासून प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे संगीत अजय- अतुल यांचे आहे. जेनिलियाचा पहिलाच मराठी चित्रपट असून याचे प्रमोशन करण्यासाठी अभिनेता रितेश व जेनेलिया यांनी बुधवारी डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पॉलिटेक्निक. मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त तेजस सतेज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे,प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सिएचआरओ श्रीलेखा साटम, डॉ. लीतेश मालदे, डॉ. राजेंद्र रायकर उपस्थित होते.
या चित्रपटातील सलमान खानवर चित्रित केलेले गाणे सुरू होताच ‘भाऊ, खाली येऊन आमच्यासोबत नाचा की...’ अशी विद्यार्थ्यांनी विनंती करताच रीतेश यांनी स्टेजवरून खाली येत विद्यार्थ्यासोबत ठेका धरला. त्यानंतर जेनेलीयालाही खाली बोलावून या दोघांनी विद्यार्थ्यांसोबत नृत्य केले. चित्रपटातील दुसरे गाणे सुरू होताच सुत्रचसंचालन करणारी विद्यार्थिनी जुही धारवाडे हिच्यासोबत रितेशने स्टेजवर नृत्य करताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला . यानंतर रितेश आणि जेनेलिया या दोघांनी या रोमँटिक गाण्यावर अतिशय सुंदर नृत्य करत विद्यार्थ्यांची मने जिंकली. ‘वेड’ या चित्रपटात एकतर्फी प्रेमाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. प्रेमासाठी या दोघांची होणारी फरफट दाखवण्यात आली आहे.
..............
डी. वाय. पाटील ग्रुप 'लय भारी'
डी. वाय. पाटील ग्रुप 'लय भारी'... येथील शिक्षण म्हणजे 'नाद खुळा'.... अशा शब्दात अभिनेता रितेश देशमुख यांनी डी वाय पाटील ग्रुपबद्दल गौरवोद्गार काढले. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील आणि संपूर्ण पाटील कुटुंबियांशी आपले घरचे नाते आहे. कोल्हापुरात यायला मला नेहमीच आवडते, असे रितेश देशमुख यांनी यावेळी सांगितले.