+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustरविवारपासून शहरात महायुतीच्या प्रचाराची रणधुमाळी - राजेश क्षीरसागर adjustडोंगळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळा adjustकोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराला मिसळ पे चर्चेचा तडका adjustवाळवा-शिराळा तालुक्यात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे
Screenshot_20240226_195247~2
schedule29 Dec 22 person by visibility 353 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  छत्रपती राजाराम कारखान्याच्या मतदार यादीच्या अर्हता दिनांकाबाबत सभासदांनी, प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभागाकडे तक्रार केली दिले आहे.  तांत्रिक अडचणीमुळे साखर कारखान्याचे काही सभासद मतदानापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे "आम्हाला मतदानाचा हक्क मिळाल्यानंतरच राजाराम कारखान्याच्या निवडणूका घ्याव्यात" अशा मागणीचे निवेदन दिले.
 मतदार यादी तयार करण्यासाठी अहऺता ३१ जानेवारी२०२२ ऐवजी ३१ मार्च २०२३ करणेत यावी. ११ नोव्हेंबर २०२२ च्या आदेशान्वये प्रारूप मतदार यादी तयार करणेसाठी निश्चित केलेल्या अर्हता  ३१ ऑक्टोंबर२०२२ नुसार कारखान्याने मतदार याद्या तयार केल्यास आम्हाला महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० नुसार प्राप्त झालेला मतदानाचा मुलभूत कायदेशीर हक्क बजावता येणार नाही. असंख्य सभासद या संस्थेच्या मतदानापासून वंचित राहणार आहेत.
 महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० नुसार आम्हाला प्राप्त झालेला मतदानाचा हक्क बजावणेसाठी सदर संस्थेच्या प्रारूप व अंतिम मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट होण्यासाठी संस्थेची प्रारूप मतदार यादी तयार करणेसाठी निश्चित केलेली मुदत ३१ मार्च २०२३ करावी अशी मागणी  सभासदांनी केली आहे.यावेळी वसंत दादू शिरगावे, राजेंद्र नामदेव शिंदे, विनोद नामदेव चव्हाण यांच्यासह शेतकरी सभासद उपस्थित होते.