महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर: चित्रकार नागेश हंकारे यांच्या रिप्लेक्शन या चित्र प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे भरविले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन सहाय्यक पोलीस आयुक्त संजय कुरुंदकर यांनी तुळशीच्या रोपाला पाणी घालून केले याप्रसंगी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्रो. विश्वनाथ साबळे ,ऐरावत आर्ट गॅलरीचे क्युरेटर जयंत पटेल , चित्रकार प्रकाश राजेशिर्के व कॅलिग्राफी आर्टिस्ट संजय हंकारे या सर्वांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन झाले
नागेश हंकारे यांचे जहांगीर मधील तिसरे प्रदर्शन आहे. रिप्लेक्शन या शीर्षकाने सुरु होणाऱ्या या प्रदर्शनामध्ये हिमालय,येथील डोंगर आणि पाण्याचे प्रतिबिंब यांचा मिलाफ पाहावयास मिळतो.
रिप्लेक्शन हे प्रदर्शन ९ जानेवारी ते १५ जानेवारी २०२३ अखेर सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे कला प्रदर्शनात पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आहे