+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule26 Sep 22 person by visibility 472 categoryशैक्षणिक
चेअरमन महादेव डावरे यांची माहिती, कर्जाचा व्याजदर पावणेदहा टक्के
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेला अहवाल सालात १ कोटी ६० लाख रुपयांचा नफा झाला आहे. त्यातून सभासदांना ४0 टक्के लांभाश देणार असल्याची घोषणा पतसंस्थेचे चेअरमन महादेव डावरे यांनी केली. संस्थेतर्फे यंदा विक्रमी लाभांश जाहीर  करण्यात आला आहे. 
खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण नुकतीच झाली. कसबा बावडा येथील श्रीराम सोसायटी सभागृहात सभा पार पडली. पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे व संचालक मंडळाच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन सभेला सुरुवात झाली.
चेअरमन महादेव डावरे म्हणाले, “पतसंस्थेने चालू साली ३५० कोटीची उलाढाल केली आहे. संस्थेला अहवाल सालात एक कोटी साठ लाख इतका विक्रमी नफा झाला आहे.त्यांतून सभासदांना १५ टक्के डिव्हिडंड व सभासद भेट म्हणून २५ टक्के असा एकूण ४० टक्के लाभांश देण्यात येणार आहे. तसेच सभासदाला देण्यात येणाऱ्या कर्जाच्या व्याजदरांत कपात केली असून सभासदांना पावणेदहा टक्के दराने ४५लाख कर्ज देण्यात येईल.”
संस्थेचे संस्थापक भरत रसाळे यांनी सभासद कर्ज मुक्ती योजना व संस्थेच्या मालकीच्या ' शिक्षक सभागृह ' उभारणीबाबत मार्गदर्शन केले संचालक शिवाजी भोसले यांनी प्रास्ताविक केले. सभेत संतोष आयरे, राजेंद्र कोरे, एस. डी. कासार, टी. आर. पाटील, दशरथ कांबळे, शिवाजी सोनाळकर, गोरख वातकर यांनी विविध व विषयासंबंधी सूचना केल्या. 
नोटीस वाचन सचिव सारिका पाटील यांनी केले. प्रोसिडिंग वाचन कार्यकारी संचालक सदाशिव साळवी यांनी केले. सभेला पतसंस्थेचे व्हाइस् चेअरमन बालीशा लंबे, संचालक आनंदा हिरुगडे, राजेश कोंडेकर, राजाराम हुल्ले, कुमार पाटील, चंद्रकांत पाटील, सूर्यकांत बरगे, छाया हिरुगडे, सल्लागार समिती सदस्य आनंदा डावरे, यशवंत कोळी, अरुण गोते उपस्थित होते. संचालक मच्छिंद्र नाळे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक विकास कांबळे यांनी आभार मानले.