महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी पार्क, इंदिरानगर झोपडपट्टीतील जळीतग्रस्त झोपडपट्टीवासियांची राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी भेट घेतली. त्या कुटुंबीयांची विचारपूस केली. समस्या जणून घेतल्या. त्या कुटुंबीयांना दिलासा दिला. जळीतग्रस्त कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी महापालिका प्रशासनाला तत्काळ बैठक व पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. याप्रसंगी महापालिका उपायुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता हर्षजित घाटगे, माजी नगरसेवक आशिष ढवळे, विश्वजित मोहिते, मुकुंद सावंत, कौस्तुभ उपाध्ये, युवराज देशमुख, विशाल नैनवाणी सोनझारी समाजाचे अध्यक्ष मारुती सोनझारी, शिवाजी सोनझारी, दिलीप सोनझारी आदी उपस्थित होते.