+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!! adjustगोकुळमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी
Screenshot_20240226_195247~2
schedule30 Sep 22 person by visibility 1734 categoryराजकीय
कारखाना सभेत अमल महाडिकांनी सतेज पाटलांना ठणकावले महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महाडिक आणि पाटील यांच्यातील राजकीय वाद आणि आरोप -प्रत्यारोपामुळे लक्ष लागून राहिलेल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी आघाडीने बाजी मारली. एक तासभर चाललेल्या सभेत सभासदांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषयाला हात उंचावत आणि मंजूर मंजूर अशा घोषणा देत बहुमताने  मान्यता दिली.कारखान्याचे संचालक अमल महाडिक यांनी राजाराम कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी जिल्हा बँकेकडून 129 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. त्या माध्यमातून कारखान्याचे विस्तारीकरण, सहवीज प्रकल्प व इथेनॉल निर्मिती प्रकल्पाची उभारणी होईल.सहवीज प्रकल्प 2024 मध्ये कार्यान्वित होईल अशी घोषणाही महाडिक यांनी केली. राजाराम कारखान्याचे कामकाज क्वाॅलिटी, क्वाॅटिंटी आणि कमिटमेंट या तीन सुत्रानुसार होईल. असे अमल महाडिक यांनी जाहीर करतात सभासदांनी मंजूर मंजूर अशा घोषणा देत टाळ्यांचा गजर केला.दरम्यान सभेसाठी दोन्ही गटांनी प्रचंड ताकद लावली होती. सभेच्या प्रारंभपासून दोन्ही गटाने घोषणाबाजी करत शक्तिप्रदर्शन घडविले. विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने समांतर सभा घेत सत्ताधारी आघाडीने सभासदांचा आवाज दाबल्याचा आरोप केला.
कारखान्याचे संचालक अमल महाडिक व काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यातील आरोप, प्रत्यारोप यामुळे  सभेकडे साऱ्यांच्या लक्ष होते. दुसरीकडे सभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात केला होता. सभेची नियोजित वेळ सकाळी अकराची होती. सत्ताधारी आघाडीच्या सभासदांनी सकाळपासूनच कारखाना परिसरात गर्दी केली. सभास्थळी उपस्थित सभासदाकडून महाडिक साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या जात होत्या. सभेला सुरुवात होण्याअगोदर अर्धा तास विरोधी सभासद सभास्थळी आले. व्यासपीठाच्या समोरील बाजूस सत्ताधारी समर्थकांनी जागा व्यापली होती त्यामुळे बसायला जागा न मिळालेल्या विरोधकांनी,  सभेला सत्ताधारी आघाडीवर बोगस सभासद आणल्याचा आरोप केला. घोषणेबाजी ही केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून सत्ताधारी आघाडीच्या  समर्थकांनी घोषणा दिल्या. त्यामुळे काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली.
 बरोबर अकरा वाजता माजी आमदार महादेवराव महाडिक, चेअरमन दिलीप पाटील, व्हाईस चेअरमन वसंत बेनाडे, संचालक अमल महाडिक, हरीष चौगुले, आनंदा तोडकर, सिद्धू नरबळ, पंडित पाटील, प्रशांत तेलवेकर, दिलीप उलपे, राजाराम मोरे, कुंडलिक चरापले, केशव कांबळे, कल्पना पाटील पांडुरंग पाटील, बिरदेव तानगे, नेमगोंडा पाटील, शिवाजी घोरपडे, वडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, माजी महापौर सुनील कदम, सत्यजित कदम हे व्यासपीठावर दाखल झाले. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी हात उंचावत सभासदांना अभिवादन केले.
 सभेच्या प्रारंभी गेल्या वर्षभरात मृत्युमुखी पडलेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील म्हणाले, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली राजाराम कारखान्याचे कामकाज उत्तम पद्धतीने सुरू आहे. सभासदांना न्याय देण्याची भूमिका संचालक मंडळाचे आहे‌ सभासदांच्या हितासाठी भविष्यातही हा कारखाना महाडिक यांच्या नेतृत्वाखाली चालला पाहिजे. सभासदांनी भविष्यात अशीच साथ द्यावी असे आवाहन केले.
 अमल महाडिकांचे धडाकेबाज भाषण
कारखान्याचे संचालक व माजी आमदार अमर महाडिक यांनी सभेत धडाकेबाज भाषण करत सभासदांची दाद मिळवली. राजाराम कारखाना सभासदांच्या मालकीचा आहे. भविष्यातही तो सभासदांच्या मालकीचा राहील. कसबा बावडासहित 122 गावातील सभासद हे कारखान्याचे खरे मालक आहेत. हा कारखाना कोणा एकट्या-दुकटयाचा नाही. अशा शब्दात अमल महाडिक यांनी नाव न येता आमदार सतेज पाटील यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले, सभासदांचे हित आणि कारखान्याचा विकास हे उद्दिष्ट ठेवून संचालक मंडळ कार्यरत आहे. कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी 129 कोटी रुपयाचे कर्ज केडीसी बँकेकडून मंजूर झाले आहे. त्या माध्यमातून कारखान्याच्या विस्तारीकरणासह सहवीज प्रकल्प आणि इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारला जाईल. सभासदांना दिवाळी बोनस म्हणून एक किलो साखर व दिवाळीला तीन किलो साखर दिले जाईल.
विषय पत्रिकेवरील वाचन आणि घोषणाबाजी
[कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी सभेपुढील विषयांचे वाचन केले. सभेपुढील एक ते नऊ विषय  मंजूर मंजुरी या घोषणांनी मान्यता देण्यात आली. यानंतर सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांचे वाचन झाले. एकूण 21 प्रश्न विचारले होते. सभासदांना लेखी उत्तरे पाठवलेले आहेत. शिवाय सभेतही सभासदांनी विचारलेली प्रश्ने आणि उत्तरांचे वाचन केले जाईल. असे सांगत त्यांनी क्रमाने प्रश्नं वाचनास सुरुवात केली. एक ते 16 पर्यंत प्रश्न उत्तरांचे वाचन सुरू असताना सत्ताधारी समर्थकांकडून मंजूर मंजूर अशा घोषणा सुरू होत्या. सोळाव्या प्रश्नाचे वाचन सुरू असताना विरोधी आघाडीचे समर्थक डाव्या बाजूस येऊन घोषणा देण्यास सुरुवात केली. तसेच प्रश्न विचारू लागले. त्याला उत्तर म्हणून सत्ताधारी समर्थक जोरदार घोषणा देऊ लागले या घोषणाबाजीतच सर्व प्रश्नांचे वाचन पूर्ण झाले. दरम्यान विरोधी आघाडीच्या समर्थकांनी आमदार सतेज पाटील यांचा फोटो  असलेलाा फलक उंचावत घोषणा दिल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून सत्ताधारी समर्थकांनी अमल महाडिक याांना खाांद्यावर उचलून घेतले. दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाली.                                    विरोधकांची समांतर सभा
राजाराम कारखान्याची सभा तासभर झाल्यानंतर वंदे मातरम सांगता झाली. संचालक राजाराम मोरे यांनी आभार मानले. यानंतर विरोधी समर्थकांनी कारखाना प्रवेशद्वाराच्या परिसरात समांतर सभा घेतली. मोहन सालपे, अशोक भ.पवार, बाजीराव पाटील, बाबासाहेब चौगुले यांची भाषणे झाली. सत्ताधाऱ्यांनी सभासदांना प्रश्न विचारू दिले नाहीत. सभासदांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. कारखान्यासाठी आमचा लढा सुरूच राहील असे त्यांनी भाषणात सांगितले.