+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा ! adjustदूध वाढीसाठी कुशिरेचं पुढचं पाऊल, करनाल, कोलारमधून आणले पशुधन adjustचेतन नरकेंची निवडणुकीतून माघार ! भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पाऊल मागे !! adjustहॅटस ऑफ, यूपीएससीत कोल्हापूरच्या तिघांचे यश
Screenshot_20240226_195247~2
schedule20 Jan 23 person by visibility 488 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर : "कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेमध्ये सत्तारुढ आघाडीतील काही जणांची एकाधिकारशाही सुरू आहे. पतसंस्था ही सभासदांची आहे, सभासदांच्या पाठिंब्यावर एकाधिकारशाहीला ब्रेक लावून सभासदाभिमुख आणि सर्वसमावेशक कामकाज करू" अशी ग्वाही विरोधी राजर्षी शाहू शिक्षक सेवक परिवर्तन पॅनेलचे मार्गदर्शक व शिक्षक संघाचे नेते प्रकाश देशमुख व पुरोगामी शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष विलास पिंगळे यांनी दिली. पतसंस्थेच्या पंधरा संचालकांच्या निवडणुकीसाठी रविवारी (२२ जानेवारी ) मतदान होत आहे.
  शिक्षक संघाचे प्रकाश देशमुख म्हणाले, "कमीत कमी व्याजदरात कर्जाचा पुरवठा आणि ठेवीवर आकर्षक व्याजदर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. याशिवाय सोने खरेदीसाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून दिले जाईल. सर्व सभासदांच्या विचारांचा सन्मान करून सर्व समावेशक व सभासदाभिमुख कामकाज करू. सत्तारुढ आघाडीतील काही जणांची पतसंस्थेमध्ये एकाधिकारशाही सुरू आहे. अशा मंडळींच्या स्वकेंद्रित कामकाजाला सभासदांच्या पाठिंब्याने आळा घालू."
  पुरोगामी शिक्षक संघटनेचे विलास पिंगळे म्हणाले, "स्वच्छ पारदर्शक कामकाज व सभासदांना आपुलकीची सेवा हा आमचा अजेंडा डीसीपीएस शिक्षकांना दहा लाखाचे विमा संरक्षण दिले जाईल. सभासदांना मोबाईल बँकिंग सुविधा दिली जाईल. तसेच दिवाळीला वीस हजार रुपयांचे कूपन भेटवस्तू देऊ. सध्या जो कर्जाचा व्याजदर आहे त्यापेक्षा कमी व्याजदरात कर्ज पुरवठा करण्यासाठी आमचा पुढाकार राहील. प्रचार कालावधीत सभासद मतदारांचा परिवर्तन आघाडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे यंदा पतसंस्थेमध्ये निश्चित बदल घडेल. शिक्षक संघ, पुरोगामी शिक्षक संघटना, सेवक असे असे वेगवेगळे घटक एकत्र येऊन  पॅनेलची भक्कम उभारणी केली आहे"