+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustरविवारपासून शहरात महायुतीच्या प्रचाराची रणधुमाळी - राजेश क्षीरसागर adjustडोंगळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळा adjustकोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराला मिसळ पे चर्चेचा तडका adjustवाळवा-शिराळा तालुक्यात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे
Screenshot_20240226_195247~2
schedule05 Dec 22 person by visibility 303 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘रामचंद्रपंत अमात्य यांच्यापासून शिक्षणाची परंपरा बावडेकर घराण्यात लाभली आहे. माईसाहेबांनी
शिक्षणाचे महत्व ओळखले होते. उत्तम शिक्षणासाठी प्रयत्न केले. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून मुलांच्या आयुष्याला योग्य दिशा दिली.’असे उद्गार
श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी काढले.
श्रीमंत माईसाहेब बावडेकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित माईसाहेब’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. डॉ. प्रिया दंडगे यांनी या चरित्र पुस्तकाचे
लेखन केले आहे.सृजन आनंद विद्यालयाच्या सुचिता पडळकर यांच्या हस्ते प्रकाशन समारंभ झाला. या समारंभात श्रीमंत शाहू महाराज छत्रपती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
डॉ. प्रिया दंडगे यांनी पुस्तक लेखन करताना माईसाहेबांच्या जीवनातील वेगवेगळया पैलू उलगडल्या असे नमूद केले. डॉ. उद्धव पाटील यांनी
स्वागत केले. उर्मिला माने यांनी सूत्रसंचालन केले.श्रीमंत माईसाहेब बावडेकर शाळेच्या अध्यक्षा नीतूदेवी बावडेकर, नीलराजे बावडेकर, विश्वस्त
अश्विनी वळिवडेकर, प्रिती कट्टी आदी उपस्थित होते.