+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा ! adjustदूध वाढीसाठी कुशिरेचं पुढचं पाऊल, करनाल, कोलारमधून आणले पशुधन adjustचेतन नरकेंची निवडणुकीतून माघार ! भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पाऊल मागे !! adjustहॅटस ऑफ, यूपीएससीत कोल्हापूरच्या तिघांचे यश adjustस्वीडनमध्ये मराठी कुटुंबातर्फे गुढीपाडव्याचे स्वागत adjustशाहूंचे शक्‍तीप्रदर्शन ! जनसागराच्या साक्षीने विजयाचा निर्धार पक्‍का!! adjustस्वाभिमानीचे शक्तीप्रदर्शन, शेट्टींनी बैलगाडीतून जाऊन अर्ज भरला
Screenshot_20240226_195247~2
schedule03 Jan 23 person by visibility 542 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर:'
कोल्हापूर शहरातील महानगरपालिका हद्दीतील सिटी सर्वे न झालेल्या भागात वाढीव सिटी सर्वे करून सर्व नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्याची मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
कोल्हापूर शहरामध्ये मुळ सिटी सर्वे १९३५ ते १९४५ पर्यंत झाला आहे. तर कसबा बावडासाठी १९५६ला, फुलेवाडीचा काही भाग १९८६ ला सिटी सर्वे झाला आहे. आज कोल्हापूर महानगरपालिकेची हद्द पाहता संपूर्ण महानगरपालिका क्षेत्राचा सिटीसर्वे झालेला नाही. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील अंदाजे ८०००० मिळकतींना प्रॉपर्टीकार्ड मिळत नाहीत. त्यामुळे नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेणे, बांधकाम परवाने सुलभरित्या मिळविणे, कर्ज प्रक्रिया, तसेच अनेक शासकिय योजनांचा लाभ मिळत नाही. 
वाढीव सिटी सर्वे करणेबाबत सन २०१६ मध्ये भूमी अभिलेख विभागाने प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावामध्ये मोजणीची रक्कम महापालिकेने भरणा करावयाची आहे असे नमूद केले होते. तरी आवश्यक त्या रकमेची शासन स्तरावरुन तजवीज करणेत येउन कोमनपा हद्दीतील ज्या भागाचा सिटीसर्वे झालेला नाही त्याची मोजणी होऊन सर्व मिळकतधारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळण्याविषयी योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती  महाडिक यांनी केली आहे.