+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustछत्रपतींच्या सुनेच्या मोटारीचे कुपेकरांच्या कन्येने केले सारथ्य adjustकोल्हापूरसाठी २३ ! हातकणंगलेसाठी २७ उमेदवार लढणार !! adjustनरेंद्र मोदींची २८ एप्रिलला कोल्हापुरात जाहीर सभा ! राजेश क्षीरसागरांची माहिती adjustस्टोरीमॅप स्पर्धेत विद्यापीठाचे अभिजीत पाटील विजेते ! बांदिवडेतील अग्निस्तंभावर आधारित विषय !! adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा! adjustखासदार धैर्यशील मानेंचा कोडोलीत दौरा : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद adjustकोरे अभियांत्रिकीत युरेका जिज्ञासा २के २४ चे दिमाखात उद्घाटन adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको ? आमदार सतेज पाटलांचा मंडलिकांना सवाल adjustराधानगरीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते एकवटले शाहू छत्रपतींच्या विजयासाठी -अभिजीत तायशेटे adjustफ्रान्समधील स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या पाच खेळाडूंची निवड
Screenshot_20240226_195247~2
schedule19 Sep 22 person by visibility 720 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :संशोधन क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या संशोधकांना नोबेल पुरस्कारांनी गौरविले जाते. संशोधन क्षेत्रातील हा जागतिक स्तरावरील अतिशय मानाचा, प्रतिष्ठेचा पुरस्कार. १९०१ ते २०२१ या कालावधीत ८८९ पुरुष संशोधक, ५८ महिला संशोधक व २८ संस्थांना या पुरस्कारांनी सन्मानित केले. शास्त्र शाखेत ६२९ शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक प्राप्त झाला आहे. यामध्ये २३ महिला शास्त्रज्ञ आहेत. मेरी क्युरी यांना दोन वेळा हा पुरस्कार मिळाला. मात्र नोबेल विजेत्या या महिला शास्त्रज्ञाविषय, त्यांच्या संशोधनाविषयी मराठीत लिखाण खूपच कमी झाले. नेमकी हीच कसर भरुन काढत कोल्हापूरच्या प्रा. तेजस्विनी सुरेश देसाई यांनी ‘विज्ञानातील नोबेल शलाका’ या नावांनी पुस्तक निर्मिती केली आहे.
 या पुस्तकातून संशोधनाच्या वाटा निर्माण करणाऱ्या विज्ञानातील नोबेल शलाका मराठी वाचकांना भेटणार आहेत. शिवाय नोबेल पुरस्कार प्राप्त महिला शास्त्रज्ञांचा संघर्ष, संशोधन आणि त्यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडणार आहे.
  या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ सोमवारी (ता.१९ सप्टेंबर) होत आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या हस्ते आणि शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होत आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी पाच वाजता हा समारंभ होत आहे. अनुबंध प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
डॉ. तेजस्विनी देसाई या केआयटीमध्ये अध्यापन करतात. पदार्थविज्ञान विषयाच्या त्या प्राध्यापिका. डॉ. देसाई यांनी गेली साडेतीन-चार वर्षे परिश्रम घेउन नोबेल विजेत्या महिला शास्त्रज्ञाविषयी लेखन केले आहे. महिला शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन केंद्रस्थानी ठेवून त्यांचा जीवनप्रवास मांडला आहे. त्या महिला शास्त्रज्ञांनी पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र आणि वैद्यकीयशास्त्रात काम केले. मूलभूत संशोधन केले
“ नोबेल विजेत्या महिला शास्त्रज्ञांचा सारा प्रवास प्रेरणादायी असा आहे. महिला शास्त्रज्ञांनी कोणकोणत्या प्रसंगाला तोंड देत हिंमतीने संशोधन केले ते तपशीलवारपणे मांडले आहे. वैज्ञानिक परिभाषा, आकृत्याची जोड दिल्यामुळे ‘विज्ञानातील नोबेल शलाका’हे पुस्तक विज्ञानविषयाची गोडी वाढविणारे आहे. मूलभूत संशोधनाची ओळख करुन देणारे आहे.” अशी भावना डॉ.तेजस्विनी देसाई यांनी व्यक्त केली. या पुस्तकनिर्मितीकामी त्यांना पती व शेतकरी सहकारी संघाचे माजी मुख्य कार्यकारी संचालक सुरेश देसाई यांनी प्रोत्साहित केले. प्राचार्य टी. एस. पाटील यांनी लिखाणासंबंधी मार्गदर्शन केले.