+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराला मिसळ पे चर्चेचा तडका adjustवाळवा-शिराळा तालुक्यात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप
Screenshot_20240226_195247~2
schedule25 Aug 22 person by visibility 414 categoryलाइफस्टाइल
सचिवपदी महादेव व्हरांबळे, खजिनदारपदी अविनाश बोकील
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
रोटरी क्लब ऑफ शिरोली एमआयडीसी कोल्हापूर पुरस्कृत प्रोबस क्लब ऑफ आरके.नगरच्या कार्यकारणीची वार्षिक सभा झाली. त्यामध्ये सन २०२२-२३ साठी पदाधिका-यांची निवड करण्यात आली. हा समारंभ आर.के.नगर,कोल्हापूर येथील सुर्यवंशी सांस्कृतिक हॉल येथे कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमात खजिनदार प्रो. अविनाश बोकील व धावपटू महिपती संकपाळ यांनी मनाली ते लेह असा सुमारे ७०० कि.मी. सायकल प्रवास पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
कोल्हापूर टूर्स असाोसिएशनचे अध्यक्ष बळीराम वराडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडलेल्या या कार्यक्रमामध्ये अध्यक्षपदी प्रो.आप्पासाहेब घाटगे, उपाध्यक्षपदी रावसाहेब सुर्यवंशी, सचिवपदी महादेव व्हरांबळे, खजिनदारपदी अविनाश बोकील या पदाधिका-यांचा पदग्रहण समारंभ झाला. नूतन अध्यक्ष घाटगे यांनी येत्या वर्षापासून ८० वर्षावरील सभासदांचा जीवन गौरव समारंभ व सभासदांच्या ज्या मुलांनी दहावी व बारावी परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले, त्यांना बक्षीस वाटप करण्यात येईल तसेच नव्याने शंभर सभासद करण्याचे उद्दिष्ट असल्याचे जाहीर केले. व्ही.बी.साबळे यांनी सूत्रसंचालन केले. महादेव व्हरांबळे यांनी आभार मानले.
याप्रसंगी रोटरीयन संजोय संकपाळ, दिलिप पवार, सुनिल जाधव, मिलींद जगदाळे व प्रोबस क्लबचे संचालक प्रा. सतीश जामदार ,डॉ. सुधीर भोसले, रणजित लिंग्रस, बाबासाहेब बुरटे देसाई व सभासद अशोक जगदाळे, सदानंद महाजन, ए. के. कुलकर्णी, अविनाश कशाळकर, शरद फडके, अँड. शशिकांत वडणेरकर, शरद कांबळे, अशोक मधाले आप्पासाहेब शिरगांवे, सदाशिव राजे, सुकुमार पाटील, मलगोंडा पाटील उपस्थित होते.