+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश
Screenshot_20240226_195247~2
schedule09 Jan 23 person by visibility 208 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : रसिकाग्रणी  मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचातर्फे सहा ते आठ जानेवारी २०२३ या कालावधीत आयोजित  राज्यस्तरीय
भावगीत व नाट्यगीत गायन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दिमाखात पार पडला. तसेच तीन दिवशी संगीत मैफलीचा समारोप झाला.
स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी वय वर्षे ३६ ते ५५ या वयोगटांतर्गत भावगीत स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यासह मिरज, पुणे येथील २५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. सायंकाळच्या सत्रात सुरवातीला राज्यस्तरीय ९ ते १४, १५ ते ३५ व ३६ ते ५५ या वयोगटातील भावगीत व नाट्यगीत स्पर्धेतील
प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे अध्यक्ष पद्माकर सप्रे, संस्थेच्या नियामक मंडळाचे सल्लागार व मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया, नियामक मंडळाचे अध्यक्ष निर्मलकुमार लोहिया, उपाध्यक्ष नितीन वाडीकर, नेमचंद संघवी, प्रशांत लोहिया, राजेश लोहिया, डॉ. गिरीश वझे, डॉ. हेमिनी चांदोलकर, प्रा. सतीश कुलकर्णी, डॉ. शीतल धर्माधिकारी यांच्या हस्ते झाला. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, श्रीमती मीना वझे, संस्थेचे सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, सहसचिव एस्. एस्. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे  वयोगट ९ ते १४ - भावगीत - प्रथम क्रमांक : ऋषिकेष ढवळीकर (गोवा), द्वितीय क्रमांक : कु. सार्था गवाणकर (रत्नागिरी), तृतीय
क्रमांक : निरज सपाटे (कोल्हापूर). वयोगट ९ ते १४ - नाट्यगीत - प्रथम क्रमांक : ऋषिकेष ढवळीकर (गोवा), द्वितीय क्रमांक: कु. सार्था गवाणकर (रत्नागिरी ). वयोगट १५ ते ३५ - भावगीत - प्रथम क्रमांक: अर्णव बुवा (गडहिंग्लज), द्वितीय क्रमांक : कु. गीता तावडे (कोल्हापूर), तृतीय क्रमांक : अक्षत वैद्य (ठाणे). वयोगट १५ ते ३५ - नाट्यगीत - प्रथम क्रमांक : अर्णव बुवा (गडहिंग्लज), द्वितीय क्रमांक: कु. प्रियांका मिरजकर (इचलकरंजी), तृतीय क्रमांक: स्वाती खेडेकर (कोल्हापूर). वयोगट १६ ते ५५ - भावगीत - प्रथम क्रमांक : राजू लोखंडे (रुकडी), द्वितीय क्रमांक : डॉ. चेतन होशिंग (पुणे), तृतीय क्रमांक : रुपाली
विघारे (पुणे). वयोगट १६ ते ५५ - नाट्यगीत - उत्तेजनार्थ : अमृता मोडक (ठाणे).
यानंतर संगीत समारोहामध्ये ख्यातनाम गायक पंडित रघुनंदन पणशीकर व ज्येष्ठ गायिका  अर्पणा केळकर यांनी 'रंगी रंगला श्रीरंग' या भाव-नाट्य-भक्तिगीतांच्या सादरीकरणातून रसिकांना मंत्रमुग्ध केले. सुरुवातीला पं. रघुनंदन पणशीकर यांनी राग भूप मधील
सहेला रे ही बंदिश सादर केली, तर अपर्णा केळकर यांनी राग सोहनी सादर केला. यानंतर एकापेक्षा एक बहारदार गाण्यांच्या सादरीकरणाने रसिकांना मोहिनी घातली. विघ्नेश जोशी यांच्या निवेदनाने रंगत आणली.
कार्यक्रमात सचिन जगताप (बासरी), अभिषेक सिनकर (हार्मोनियम), आशय कुलकर्णी (तबला), कृष्णा साळुंखे
(पखावज), हरी जोशी (टाळ) यांनी उत्कृष्ट साथसंगत केली.
या संगीत समारोहास श्रीमती शीलादेवी लोहिया, प्रा. गोविंद पैठणे, उमा भेंडीगिरी, सयाजीराव पाटील, प्रदीप पोवार, सुधाकर अतिग्रे, मोहन भांडवले, सतीश माळी,  गौरी कुलकर्णी, श्रीमती स्नेहा फडणीस, अर्पणा चिकोडे, श्रीपाद रामदासी, प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.