+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा ! adjustदूध वाढीसाठी कुशिरेचं पुढचं पाऊल, करनाल, कोलारमधून आणले पशुधन adjustचेतन नरकेंची निवडणुकीतून माघार ! भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पाऊल मागे !! adjustहॅटस ऑफ, यूपीएससीत कोल्हापूरच्या तिघांचे यश
Screenshot_20240226_195247~2
schedule27 Sep 22 person by visibility 531 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्यावतीने ३६ वी राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशीप २९ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत गुजरात येथे होणार आहेत. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य महिला फुटबॉल संघ पाठविणेत येणार आहे. या संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून के.एस.ए.च्या उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू व " डी " लायसन्स प्रशिक्षक - पृथ्वी लालासाहेब गायकवाड यांची नेमणूक वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने केली आहे.
 संघ व्यवस्थापकपदाची जबाबदारी पहिल्यांदाच कोल्हापूरच्या महिला खेळाडू व प्रशिक्षक पृथ्वी यांच्या नेमणूकीने मिळालेली आहे. पृथ्वी ह्या एक उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू असून गेली अनेक वर्षापासून शालेय, महाविद्यालयीन, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धांमध्ये खेळलेल्या आहेत. त्यांनी के.एस.ए.च्या कनिष्ठ मुली व वरिष्ठ महिला कोल्हापूर जिल्हा संघासाठी प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून कामकाज केलेले आहे.
पृथ्वी गायकवाड यांना संस्थेचे पेट्रन-इन्‌चीफ्‌ शाहू महाराज, पेट्रन्‌मेंबर माजी खासदार युवराज संभाजीराजे, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे कार्यकारिणी सदस्य, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्या मधुरिमाराजे, माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी यांनी अभिनंदन केले आहे.