+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule02 Sep 22 person by visibility 653 categoryगुन्हे
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
कौटुंबिक न्यायालयातील अटक वॉरंट कामकाजात मदत करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना हातकलंगले पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक नामदेव औदुंबर कचरे (वय 36 रा. उचगाव ता करवीर ) याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.
पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली. या गुन्ह्यातील तक्रारदाराची कर्नाटकातील धारवाड येथील कौटुंबिक न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्यात अनेक तारखांना तक्रारदा हजर नसल्याने त्याच्या विरोधात कोर्टाने अटक वॉरंट जारी केले होते. तक्रारदाराला अटक न करता या प्रकरणातमदत करण्यासाठी पोलीस नाईक कचरे यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर लाचेची रक्कम दोन हजार रुपये ठरली. त्यानंतर तक्रारदाराने 29 ऑगस्ट रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलिसांनी 29 आणि 30 ऑगस्ट रोजी तक्रार तक्रारीची खातरजमा केली. त्यानंतर आज शुक्रवारी पोलिसांनी सापळा रचला. हातकणंगले पोलीस ठाण्याच्या बाजूस रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यांवर तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. या कारवाईत पोलीस अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, पोलीस उपनिरीक्षक संजय बंबरगेकर, हेड कॉन्स्टेबल शरद पोरे, विकास माने ,सुनील घोसाळकर , नवनाथ कदम, मयूर देसाई , रुपेश माने, विष्णू गुरव यांनी कारवाईत भाग घेतला.