महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी :
शुक्रवार पेठ येथून रणजीत एकनाथ पोवार (वय ४७ रा. विठ्ठल मंदिर जवळ, बुरुड गल्ली, शुक्रवार पेठ, कोल्हापूर) हे सोमवारी १५ ऑगस्ट पासून बेपत्ता आहेत. गंगावेश येथे रेणुका देवीचा जगाचा कार्यक्रम पाहण्यासाठी जातो, असे सांगून ते घराबाहेर पडले आहेत. त्यांच्या अंगात पांढरा फुल शर्ट, निळ्या रंगाची पॅन्ट आहे. उंची पाच फूट दोन इंच असून केस काळे, रंग गोरा आहे. या वर्णनाची व्यक्ती आढळल्यास लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनशी ( 231- 2 641933) संपर्क साधावा, असे हेड कॉन्स्टेबल जी.आय. परिट यांनी कळवले आहे.