+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustरविवारपासून शहरात महायुतीच्या प्रचाराची रणधुमाळी - राजेश क्षीरसागर adjustडोंगळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळा adjustकोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराला मिसळ पे चर्चेचा तडका adjustवाळवा-शिराळा तालुक्यात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे
Screenshot_20240226_195247~2
schedule08 Sep 22 person by visibility 376 categoryक्रीडा
🤼महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथे पोथी समाप्ती निमित आयोजित उडाप्पी कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती पवन भांदिगरे विरुद्ध ऋत्विक सातपुते पाडळी यांच्यात झाली. यामध्ये पवन भांदिगरे वाळवेने दोन मिनिट पन्नास सेकंदात एकचाक डावावर विजय मिळवला.
ही कुस्ती कुस्ती धोडीराम खोत, संरपच रावण खोत , राजाराम खोत, तानाजी खोत, भिकाजी खोत, कृष्णात खोत, अशोक खोत कुलदीप खोत यांच्या हस्ते लावण्यात आली. आखाडा पूजन पैं . भिकाजी खोत यांच्या हस्ते व धोडीराम स . खोत, संरपंच रावण खोत , प्रकाश खोत यांच्या हस्ते झाले.
क्रमांक दोनची कुस्ती चांदेवरकवाडीच्या अक्षय खोत विरुद्ध सुशांत पाटील (वाशी) यांच्यामध्ये झाली. खोतने ही कुस्ती लपेट डावावर जिंकली. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत अपूर्व पाटील अर्जुन वाडा याने रोहित खोत चांदेकरवाडी याला निकाल डावावर विजय मिळवला.
अभिषेक नलवडे बेलवळेने रोहित पाटील सावर्डे या कुस्तीपटूवर तर यश पाटील बेलवळेने तनविर कांबळे बाचणी यांच्या विरोधातील कुस्ती जिंकली. अक्षय चौगले अर्जुनवाडाने मचिंद्र सांवत चांदेकरवाडी वर विजय मिळवला. त्याचबरोबर चांदेकरवाडीची महिला पैलवान संजिवनी खोत व नंदगावची आकांश कुराडे यांच्यातील कुस्ती बरोबरीत सुटली.
मैदानात ७० कुस्त्या झाल्या. पंच म्हणून तालीम संघाचे सचिव प्रकाश खोत यांच्या मार्गदर्शनाखाली पंच म्हणून भिकाजी खोत, निवास खोत, कृष्णात खोत, कुलदीप खोत व दतात्रय पताडे यांनी काम पाहिले. बापूसो खोत यांनी सूत्रसंचालन केले. राजाराम खोत यांनी आभार मानले.