+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!! adjustगोकुळमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustडीवाय पाटील फार्मसीतर्फे रविवारी मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह adjustछत्रपतींच्या सुनेच्या मोटारीचे कुपेकरांच्या कन्येने केले सारथ्य adjustकोल्हापूरसाठी २३ ! हातकणंगलेसाठी २७ उमेदवार लढणार !!
Screenshot_20240226_195247~2
schedule27 Jan 23 person by visibility 466 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : " पवार कुटुंबिंयावर बोलण्यासाठी काही जणांना आमदार केले आहे. आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांच्या राजकारणासाठी पवारावर बोलत असतात. मात्र त्यांनी पवारांची काळजी करू नये. पवारांच्या राजकारणाची काळजी करण्यापेक्षा पडळकरांनी स्वतःच्या राजकारणाची काळजी करावी. पवार त्यांना कळणार नाहीत." असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी लगावला.
महाराष्ट्र व्हिजन फोरमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार रोहित पवार शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत याप्रसंगी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भाजपच्या राजकारणावर टीकास्त्र सोडले. गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबावर केलेल्या टीकेचाही रोहित यांनी समाचार घेतला.
"राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी पंतप्रधानांच्याकडे राजीनामा देण्यापेक्षा राष्ट्रपतींच्याकडे  राजीनामा सादर करावा. केवळ ट्विट न करता पेन आणि पेपर हाती घ्या आणि तत्काळ राष्ट्रपती कार्यालयाला राजीनामापत्र पाठवावे" अशी टिप्पणी पवार यांनी केली.
भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राची क्षमता व विचारसरणी कळलेली नाही. भाजपचे मंडळी लोकांच्या हिताचे बोलत नाहीत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सल्ला घ्यावा. मुळात पंतप्रधान मोदी हे चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटण्यासाठी वेळ देतील का हा पुढचा विषय आहे "असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा पहाटेच्या शपथविधीवरुन सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना रोहित पवार म्हणाले, "पहाटेच्या त्या शपथविधी संबंधी दोनच व्यक्ती खरं काय ते सांगू शकतील. त्यापैकी एक म्हणजे शरद पवार आणि दुसऱे म्हणजे अजित पवार. तेव्हा नेमके काय घडले तेच यासंबंधी अधिक स्पष्टपणे सांगू शकतील."
  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना शरद पवार यांचे विचार कळलेच नाहीत असेही रोहित पवारांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले. भाजपला प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष मदत होईल असे कोणतेही वक्तव्य आणि कृत्य कोणी करू नये. उगाचच कोणी स्टेटमेंट  करू नयेत. भाजपच्या विरोधात खंबीरपणे लढत असेल तर सगळ्यांनी मोठे मन दाखवायला हवं. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार होते त्या त्या ठिकाणी बीजेपीच्या उमेदवाराला फायदा झाला आहे हे ही रोहित पवार यांनी निदर्शनास आणले