+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule04 Oct 22 person by visibility 307 categoryउद्योग
कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोशिएशनतर्फे गौरव, डॉ संजय डी. पाटील यानी स्वीकारला पुरस्कार
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील सहकारी बँकेस कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोशिएशनतर्फे नागरी बँक श्रेणीमध्ये ठेवीबाबत उत्तम कामगिरी केल्याबद्दल ‘उत्कृष्ट बँक’ म्हणून प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे यांच्या हस्ते डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष व डी. वाय. पाटील बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी स्वीकारला.
 यावेळी जिल्हा नागरी सह. बँक असोशिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागराळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम कारंडे, संचालक अरुण अलासे, वारणा बँक संचालक प्रमोद कोरे, विश्वेश कोरे, वारणा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सार्दळकर, त्याचबरोबर डी. वाय. पाटील सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन धैर्यशील घाटगे, संचालक संजय जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ मोर्ती, व व्यवस्थापक श्रीधर सांगले, सहाय्यक व्यवस्थापक संदीप पाटील आदी यावेळी उपस्थित होते. 
श्रीराम सहकारी बँक, इचलकरंजी २०००-२००१ मध्ये डी. वाय. पाटील ग्रुपने अधिग्रहीत केली. डॉ. संजय डी. पाटील यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली या बँकेने आपल्या कार्यपद्धतीत आमुलाग्र बदल करत सातत्याने नफा मिळवला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार बँकेने पारदर्शक कारभार करत अनेक गरजवंताना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. ऑडीट वर्ग ‘अ’ आणि शून्य एनपीए असलेल्या या बँकेला यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. 
या पुरस्काराने बँकेच्या पारदर्शक व सचोटीच्या कारभारावर पुन्हा एकदा शिक्कमोर्तब झाले आहे. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील व सौ.शांतादेवी पाटील यांचे आशिर्वाद, बंधू माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांची भक्कम साथ व बँकेचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी यांची मेहनत व सभासद, ठेवीदार यांचा विश्वास व सहकार्य यामुळे बँक हे यश मिळवू शकली. यापुढेही बँकेच्या माध्यमातून सभासद, नागरिकांची जास्तीत जास्त सेवा करण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यानी दिली.