+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा ! adjustदूध वाढीसाठी कुशिरेचं पुढचं पाऊल, करनाल, कोलारमधून आणले पशुधन adjustचेतन नरकेंची निवडणुकीतून माघार ! भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पाऊल मागे !! adjustहॅटस ऑफ, यूपीएससीत कोल्हापूरच्या तिघांचे यश
Screenshot_20240226_195247~2
schedule13 Jan 23 person by visibility 2676 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राष्ट्रीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी युवा आघाडीच्यावतीने 'युगंधर' या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील युवकांची गरज ओळखून उद्यमशीलता विकास, कौशल्य विकास आणि रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी 'युगंधर'च्या माध्यमातून काम होणार असल्याचे 'आप' युवा आघाडी जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
या उपक्रमाच्या अंतर्गत 'व्यवसाय परिषद व युवा सत्कार' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी आय टी असोसिएशनचे माजी अध्यक्ष विनय गुप्ते हे प्रमुख वक्ते असणार आहेत. जिल्हा आर्थिक साक्षरता प्रशिक्षण केंद्राचे उदयकुमार जोशी हे विविध शासकीय योजना, प्रोजेक्ट लोन व सबसिडी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमासाठी युवा आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सिद्धेश भगत, राज्य संघटक संदीप सोनावणे, खजिनदार सी ए योगेश इंगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. कार्यक्रम रविवारी (पंधरा जानेवारी) उद्यमनगर येथील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या शेठ रामभाई सामानी हॉल येथे सायंकाळी पाच वाजता होणार असल्याचे युवा शहराध्यक्ष मोईन मोकाशी यांनी संगितले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक पाटील, आदम शेख, अरिहंत उपाध्ये, शशांक लोखंडे, प्रथमेश सूर्यवंशी, मयूर भोसले, राम शिंगाडे, साद शिलेदार, दीपक नलवडे आदी उपस्थित होते.