+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!!
Screenshot_20240226_195247~2
schedule24 Dec 22 person by visibility 505 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन  प्रतिनिधी कोल्हापूर : 
जुना राजवाडा ते नवीन राजवाडा (न्यू पॅलेस) हा रस्ता हेरिटेज मार्ग म्हणून विकसित होणार आहे. शनिवारी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रशासनाला या संदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोल्हापूर शहरातील अंबाबाई मंदिर परिसरात विविध पायाभूत सुविधा निर्माण करणे, पंचगंगा घाट परिसरात विकास कामे राबवणे, रंकाळा परिसरात पर्यटनाच्या दृष्टीने सोयीसुविधा निर्माण करणे यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी पुढील सात दिवसात कामांचे प्रस्ताव नियोजन विभागाला सादर करावेत, असे   केसरकर यांनी यावेळी सांगितले.
सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 साठी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर करण्यात आलेला निधी 31 मार्च 2023 अखेरपर्यंत 100 टक्के खर्च करावा. कोणत्याही परिस्थितीत निधी परत जाणार नाही याबाबत सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे आदेशही पालकमंत्री केसरकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री केसरकर मार्गदर्शन करत होते. यावेळी नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन केलेल्या मित्राचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, इचलकरंजी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
 पालकमंत्री केसरकर म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2023-24 चा 389 कोटीचा प्रारुप आराखडा तसेच अनुसूचित जाती उपायोजनेचा 116 कोटीच्या प्रारूप आराखड्यास समितीने मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले. सन 2022-23 ची सर्वसाधारण योजना 425 कोटी व अनुसूचित जाती उपायोजना . 116 कोटीचा मंजूर असलेला निधी 31 मार्च पर्यंत खर्च करावा, असे आदेशही दिले. ज्या शासकीय यंत्रणांचा निधी खर्च होऊ शकत नाही अशा यंत्रणांनी सदरचा निधी तात्काळ नियोजन समितीला समर्पित करावा. जेणेकरून ज्या शासकीय यंत्रणा हा निधी खर्च करु शकतील त्यांना तो विकास कामासाठी देण्यात येईल. तसेच सर्व संबंधित यंत्रणांनी मंजूर असलेली विकास कामे त्वरित सुरु करावीत, असेही असे त्यांनी सुचित केले. 
  कोल्हापूर शहरातील कुस्त्यांचे प्रशिक्षण ज्या तालमींमध्ये दिले जाते त्यांची दुरावस्था झालेली दिसून येत आहे. तरी या तालीमींसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री केसरकर यांनी दिली व त्याबाबतचे प्रस्ताव संबंधित विभागाने त्वरित नियोजन समितीला सादर करावेत, असेही सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यातील एक ही शाळा नादुरुस्त राहणार नाही यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. राजाराम कॉलेजसाठी वेगळा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच या ठिकाणी एक आदर्श शाळा निर्माण करण्याबाबत नागरिक व तज्ञ व्यक्ती यांनी सूचना कराव्यात, असे आवाहन केसरकर यांनी यावेळी केले. त्याप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्याला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.    यावेळी आमदार सर्वश्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील, प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील यड्रावकर, राजूबाबा आवळे, पी.एन. पाटील, प्रकाश आबिटकर व श्रीमती जयश्री जाधव हे लोकप्रतिनिधी उपस्थित होते..