Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गांधीनगरमधील अनधिकृत बांधकामावरील कारवाईला स्थगिती देण्यास सर्किट बेंचचा नकारअजीम नवाज राही यांना रत्नाकर काव्य पुरस्कारकुलगुरू नियुक्तीला दिरंगाई, सिनेट सदस्यांचे राज्यपालाना पत्र ! लाठया खाऊ, जेलमध्ये जाऊ पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही ! नऊ जूनला कोल्हापुरात महामोर्चा !!डीवाय पाटील ज्युनिअर कॉलेजची महिमा शिर्के बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीयई-चलन संदर्भातील मागण्यांवर सरकार सकारात्मक, वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी कार्यवाही - प्रताप सरनाईकउल्का महाजन, चिन्मयी सुमीत, प्रतिभा खैरनार, नितीन कोत्तापल्ले यांना दमसा सभेचे पुरस्कारहद्दवाढीवरुन महापालिका सभा तहकूब, गांधीनगरातील अतिक्रमण हटविण्यासाठी सभागृह आक्रमक चारचाकी वाहन सारले बाजूला…नगरसेवक सवार झाले इलेक्ट्रिक बाईक, सायकलवर !कृष्णराज महाडिक यांचा बार्शी - सोलापूर एसटी प्रवास

जाहिरात

 

जरगनगर विद्यामंदिरात अधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत, अरुंधती महाडिकांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप

schedule16 Jun 25 person by visibility 576 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रिमझिम बरसणारा पाऊस, नवा गणवेश, नवीन वह्या, नवीन पुस्तके, नवा वर्ग, नवे शिक्षक आणि नविन वर्गमित्र....सोबतीला विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी फुलांची सजावट, गुलाबफुले, चॉकलेट्स...हे चित्र होते, जरगनगर येथील श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर येथील. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि उपायुक्त कपिल जगताप हे विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. तर भागिरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या हस्ते विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप झाले.

   मुलांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर फुग्यांची सुंदर कमान बांधण्यात आली होती. विद्यार्थ्यांना औक्षण करून पेढे साखर वाटप केले. महाापलिकेचे अधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांकडून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून वर्गात प्रवेश देण्यात आला. पालकमंत्री प्रकाश आबिटकरसो यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर अंतर्गत शाळेमध्ये संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या संस्कार शिबिरा अंतर्गत वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये राबवले जात आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका  नीता ठोंबरे यांनी शाळेवर पालकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल पालकांचे आभार मानले.
 सूर-श्री कलामंच कोल्हापूरमार्फत कोल्हापूर शहरातील शाळांना लेझीम, ढोल,ताशा हलगी कवायत साहित्य वाटप महाडिक यांच्या हस्ते झाले.एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत शाळा परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. संस्कार शिबिर अंतर्गत भैरवनाथ हायस्कूल बहिरेवाडीचे एन. एस. झारी यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
  कार्यक्रमास नाना जरग सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत जरग,  प्राथमिक शिक्षण समिती कडील कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संध्या देवडकर, उपाध्यक्ष बाळासाहेब काळे, विमल गवळी उपस्थित होते. सुवर्णा सोनाळकर यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी मेथे- पाटील यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes