महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.
या समितीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, बंदरे मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे.
ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्न बाबींबाबत अहवालातील शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करेल.