+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustरविवारपासून शहरात महायुतीच्या प्रचाराची रणधुमाळी - राजेश क्षीरसागर adjustडोंगळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळा adjustकोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराला मिसळ पे चर्चेचा तडका adjustवाळवा-शिराळा तालुक्यात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे
Screenshot_20240226_195247~2
schedule22 May 23 person by visibility 129 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यावर ईडीकडून जाणूनबुजून कारवाई होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने कोल्हापुरात निदर्शने केली. दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर सोमवारी आंदोलन झाले. भाजप सरकार आणि ईडी विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.
 माजी महापौर आर के पोवार, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अनिल साळोखे, सेवा दलाचे बाळासाहेब देशमुख, शहर सरचिटणीस सुनील देसाई, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष महेंद्र चव्हाण आदींच्या उपस्थितीमध्ये आंदोलन झाले. 50 खोके ईडी पण ओके, भाजप हमसे डरती है ईडी को आगे करते है, ईडी सरकार हाय हाय अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनात कल्पेश चौगुले, संतोष मेंगाणे, प्रसाद आणूरकर, धनाजी पाटील, यासीन मुजावर, रविराज सोनुले, बाहुबली गाठ, सचिन मुदगल, विश्वजीत साळोखे, सचिन शिरगावे निशिकांत सरनाईक आदींचा सहभाग होता.