महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
पहिल्या ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे पहिले फातिमाबी शेख संमेलन उत्साहात झाले. या संमेलनात
पहिल्या फातिमाबी शेख पुरस्काराने नसीम जमादार यांना सन्मानित करण्यात आले.
खडकी,पुणे येथील टिकाराम जगन्नाथ काॅलेजच्या सभागृहात संमेलन झाले. या साहित्य संमेलनात पन्हाळा बुधवार पेठ येथील न्यू हायस्कूल, येथील शिक्षिका सौ.नसीम जमादार लिखित पर्यावरण प्रदूषण महामंडळ महाराष्ट्र राज्याचा ग्रामीण विभागातील प्रथम क्रमांक मिळवलेल्या 'नो मॅन्स लँड'या एकांकिका संग्रहाचे प्रकाशन संमेलनाध्यक्षा सुप्रसिद्ध कवियत्री तथा गझलकार माननीय अनिसा शेख, डॉ. सय्यद जब्बार पटेल, बालभारती पुणे किशोर मासिकाचे संपादक डॉ.किरण केंद्रे यांच्या हस्ते हस्ते झाले.