+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustरविवारपासून शहरात महायुतीच्या प्रचाराची रणधुमाळी - राजेश क्षीरसागर adjustडोंगळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळा adjustकोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराला मिसळ पे चर्चेचा तडका adjustवाळवा-शिराळा तालुक्यात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे
Screenshot_20240226_195247~2
schedule09 Nov 22 person by visibility 589 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावरील वडणगे फाट्याजवळ धारदार चाकूने सपासप वार करून खून झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. खुनानंतर आरोपी स्वतः करवीर पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
 किरण दळवी नाईक( वय 37 रा. प्रयाग चिखली, ता. करवीर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर संशयित आरोपी सुरज अडसूळ (वय 32 रा. निगवे दुमाला ता. करवीर) हा स्वतः करवीर पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. मंगळवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. अनैतिक कारण आणि बदनामीच्या कारणावरून संशयित आरोपीने खून केला असावा, असा पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गुन्ह्याचा तपास करत आहेत.