+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ?
Screenshot_20240226_195247~2
schedule22 Jan 23 person by visibility 444 categoryमहानगरपालिका
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी आघाडीने सत्ता कायम राखली. यंदाच्या निवडणुकीत श्री राजर्षी छत्रपती शाहू शिक्षक सेवक सत्तारूढ आघाडीने पंधरापैकी नऊ जागा जिंकल्या. तर शिक्षक संघ वरुटे गट व पुरोगामी शिक्षक संघटना यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शिक्षक सेवक परिवर्तन आघाडीने  जोरदार लढत देऊन सहा जागा जिंकल्या.  
 दरम्यान सत्ताधारी आघाडीतून वसंत आडके, कुलदीप जठार, सुधाकर सावंत, संजय पाटील, लक्ष्मण पोवार, राजेंद्र गेजगे, उमर जमादार, मनीषा पांचाळ, भारती सूर्यवंशी हे नऊ उमेदवार विजयी झाले. विरोधी परिवर्तन आघाडीतून  विजयकुमार माळी, प्रदीप पाटील , नेताजी फराकटे, विलास पिंगळे, विजय सुतार, प्रभाकर लोखंडे हे सहा उमेदवार विजयी झाले. पतसंस्थेसाठी रविवारी (22 जानेवारी) ९९ टक्के इतके मतदान झाले. ४१३ सभासदापैकी ४१०  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यंदाची निवडणूक दुरंगी झाली १५ जागेसाठी ३० उमेदवार रिंगणात होते. राजर्षी छत्रपती शाहू सत्तारुढ पॅनेल व विरोधी राजर्षी शाहू शिक्षक सेवक परिवर्तन पॅनेल या दोन आघाड्यांमध्ये थेट लढत झाली. सत्ताधारी आघाडीने गेल्या सात वर्षात केलेल्या पतसंस्थेच्या उत्कृष्ट कामकाजावर प्रचारात फोकस ठेवला होता. तर विरोधी आघाडीने सत्ताधारी मंडळींच्या एकाधिकारशाहीवर आक्षेप ठेवत यंदा पतसंस्थेमध्ये परिवर्तन करण्याची हाक दिली होती. दोन्ही आघाड्याने चुरशीने प्रचार केला होता. यामुळे मतदानाचा टक्का वाढला. यामुळे निकालाविषयी उत्सुकता वााढली होती.
 विरोधी राजर्षी शाहू शिक्षक सेवक परिवर्तन पॅनेलमध्ये शिक्षक संघ, पुरोगामी शिक्षक संघटना आणि समविचारी शिक्षक सेवक एकत्र आहेत. यामध्ये शिक्षक संघाच्या सात जागा तर पुरोगामी शिक्षक संघटना पाच जागा लढविल्या होत्या. समविचारी शिक्षक सेवकांना तीन जागा दिलेल्या होत्या. सत्ताधारी पॅनेलमध्ये शिक्षक समिती, उर्दू शिक्षक संघटना, कास्ट्राईब  संघटना आणि  सेवक यांचा सहभाग होता. मतमोजणीत सुरुवातीला तीन जागा विरोध आघाडीने जिंकल्या त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्यामध्ये अस्वस्थता वाढली. दरम्यान सर्वसाधारण व महिला गटात सत्ताधाऱ्यांनी आघाडी घेतली. पहिल्या फेरीमध्ये सत्ताधारी आघाडीचे उमेश देसाई व विरोधी आघाडीचे प्रदीप पाटील यांना प्रत्येकी २०४ इतकी मते मिळाली. यामुळे हा निकाल  चिट्टीद्वारे घेण्यात आला.  यामध्ये विरोधी आघाडीचे प्रदीप पाटील विजय ठरले.
  राजर्षी छत्रपती शाहू सत्तारुढ पॅनेलमधील उमेदवार व त्यांना प्राप्त मते : वसंत आडके २२३, संजय कडगावे १९७, राजेंद्र गेंजगे २२४, कुलदीप जठार २१०, उमर जमादार २३७, उमेश देसाई:२०४, संजय जोतिबा पाटील २१८, सुनील नारायण पाटील १९७, सुधाकर सावंत २२९, लक्ष्मण पोवार २१०, मनीषा पांचाळ २११, भारती सूर्यवंशी २१४ , संदीप सुतार १९०, सुभाष धादवड १९०, मनोहर सरगर यांना १९९ इतकी मते मिळाली. विरोधी राजर्षी शाहू शिक्षक सेवक परिवर्तन पॅनेलमधील प्रकाश गावडे १७६, शिवाजीराव गुरव १७५, संजय टोणपे १८६, अजितकुमार पाटील १६९ , प्रदीप पाटील २०४ , नेताजी फराकटे २०९, सुनील भांबुरे १७३, दिलीप माने १८८, विजयकुमार माळी २०८, रवींद्र साळोखे १९७ , सुजाता पोवार १९७, स्वाती लंगडे १८८, विजय सुतार २१८ , प्रभाकर लोखंडे २१४, विलास पिंगळे २१० यांना इतकी मते प्राप्त आहेत.