महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
लक्ष्मीपुरी पोलिसांनी मोटरसायकल चोरास अटक करून 25 हजार रुपये किंमतीची चोरीस गेलेली मोटर सायकल जप्त केली. जमीर मौला लाड (वय 35, रा. मदिना कॉलनी, उचगाव , ता. करवीर) असे संशयिताचे नाव आहे.
लक्ष्मीपुरी पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली. 12 जानेवारी रोजी लक्ष्मीपुरीतील बस स्टॉप जवळील कलापी स्टोअर्स येथून विकास कांतीलाल राठोड यांची बजाज कंपनीची प्लेटिना मोटरसायकल चोरीला गेली. त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये वाहनचोरीची फिर्याद दिली.पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी तपासाचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक इकबाल महात यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने तपास सुरू केला.वाहन चोरीतील संशयित जमीर लाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने वाहन चोरीची कबुली दिली. या कारवाईत हेड कॉन्स्टेबल रणजीत देसाई ,रोहित मर्दाने, प्रतीक शिंदे, संजय कोळी, सुहास पाटील, संदीप कुंभार सहभागी झाले होते.