महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
कळंबा कारागृहात मोका गुन्ह्यातील कैद्याने शिपायाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली. कळंबा कारागृहात मोका गुन्ह्याखाली सागर कल्याण रजपूत हा शिक्षा भोगत आहे. नर्सिग विभागात औषधोपचारासाठी सागर रजपूत आला. यावेळी कारागृहातील शिपाई रुपेश बाजीराव ढमाले (वय ३९) हा नर्सिग आर्डर्ली म्हणून ड्यूटीवर होता. सागरने शिपाई रुपेश ढमालेकडे बघत ‘तुला लई मस्ती आली आहे काय?, तुला बघून घेतो’ अशी धमकी देत त्याच्या अंगावर धाऊन गेला. शिपाई ढमाले याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता सागरने शिपाई ढमाले याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कैदी सागर रजपूत याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार अभिजीत इंगळे अधिक तपास करत आहेत.