महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
कळंबा मध्यवर्ती कारागृहात स्पीड पोस्टाच्या माध्यमातून कादंबरीतून मोबाईल पाठवण्याची घटना उघडकीस आली. कालच पोस्टातूत कच्चा गांजा पाठवण्याचा प्रयत्न उघडकीस आला. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.
कळंबा कारागृहात रोज कैद्यांना पत्रे येतात. ही पत्रे तपासण्याचे काम एका कैद्याकडे दिले जाते. पत्रे, रजिस्टर तपासण्याचे काम सुरू असताना श्रीमानयोगी कांदबरीतून एक मोबाईल, चार बॅटऱ्या, एक चार्जर मिळून आला. त्या कैद्याने ही बाब तुरुंग प्रशासनाना कळवली. त्यानंतर तुरुंगअधिकारी निशा दिलीपकुमार श्रेयकर (वय ३१) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संशयित सुभाष संतोष वाघमोडे याने कारागृहातील कैदी दत्तात्रय कोकणे यांच्या नावाने रजिस्टर पाठवल्याची माहिती पुढे आली आहे.