महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापुरात २८ मे रोजी शासन आपल्या दारी या अभियान अंतर्गत जाहीर सभेचे आयोजन केले होते. दरम्यान २८ मे रोजी दिल्ली येथे होत असलेल्या नूतन संसद भवन उदघाटन समारंभासाठी मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार आहेत. यामुळे त्यांची कोल्हापूर येथे होणारी सभा स्थगित करण्यात आली आहे.
सभेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल असे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कळविले आहे.