+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule25 May 23 person by visibility 393 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे भारत बाबासाहेब पाटील-भुयेकर तर उपसभापतीपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचेे शंकर पाटील  यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी पी.एम. मालगावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नूतन संचालकांच्या बैठकीत सभापती +उपसभापती पदााच्या निवडीवर  शिक्कामोर्तब झाले.
 नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने १८ पैकी सोळा जागा जिंकत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे आमदार पी एन पाटील, आमदार सतेज पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के पी पाटील, संजय घाटगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील आणि मानसिंगराव गायकवाड यांनी केले होते. बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी गुरुवारी (२५ मे) नूतन संचालकांची बैठक झाली. तत्पूर्वी सर्किट हाऊस येथे सत्ताधारी आघाडीच्या संचालकांची बैठक पार पडली.
 राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय‌.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक झाली. याप्रसंगी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, युवराज पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैय्या माने  जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत,प्रदीप पाटील भुयेकर, वैभव सावर्डेकर आदी उपस्थित होते.
 दरम्यान मार्केट कमिटी येथे झालेल्या सभापती उपसभापती निवडीच्या बैठकीला संचालक राजाराम चव्हाण, प्रकाश देसाई, प्रा‌. शेखर देसाई, बाळासाहेब पाटील, सूर्यकांत पाटील, पैलवान संभाजी पाटील, पांडुरंग काशीद, संदीप वरंडेकर, सुयोग वाडकर, शिवाजीराव पाटील, नाना कांबळे, पांडुरंग काशीद कुमार आहुजा, संचालिका मेघा देसाई, सोनाली शरद पाटील उपस्थित होते.