+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustस्वाभिमानीचे शक्तीप्रदर्शन, शेट्टींनी बैलगाडीतून जाऊन अर्ज भरला adjustमुख्यमंत्र्यांनी घेतली महाडिकांची भेट, शिरोलीत दोन तास खलबतं ! adjustडीवाय पाटील इंजिनीअरिंगमध्ये टेक्निकल इव्हेंट उत्साहात adjust१०५ माजी नगरसेवकांचा संजय मंडलिकांना पाठिंबा adjustशाहू छत्रपती मंगळवारी अर्ज भरणार, महाविकास आघाडीकडून मोठे शक्तिप्रदर्शन ! adjustमहायुतीचे शक्ती प्रदर्शन ! मंडलिक, मानेंचा उमेदवारी अर्ज दाखल !! adjustप्रकाश आवाडेंची माघार, धैर्यशील मानेंना पाठिंबा ! adjust हातकणंगलेसाठी रात्रीस राजकारण चाले ! मुख्यमंत्र्यांनी घेतली कोरे, यड्रावकरांची भेट !! adjustसर्व्हेवर राजकारण चालत नाही, जनता सर्वेसर्वा- खासदार मानेंचा आवाडेंना टोला adjustही निवडणूक देशाच्या विकासाची, म्हणून मत मोदींना-हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule11 Jan 23 person by visibility 433 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते व आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ईडीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ कोल्हापुरात महाविकास आघाडीने आंदोलन केले. भाजप व ईडीच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. भारतीय जनता पक्ष राजकीय आकसापोटी विरोधी पक्षातील नेते मंडळीवर कारवाई करत असल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला. सर्वच नेत्यांनी भाजपचा निषेध केला.
 छत्रपती शिवाजी चौक येथे बुधवारी दुपारी साडेबारा वाजता आंदोलन झाले. माजी महापौर आर.के‌ पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी उपमहापौर प्रकाश पाटील, अर्जुन माने, स्थायी समितीचे माजी सभापती अजित राऊत, राजेश लाटकर, शारंगधर देशमुख, आदिल फरास आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.
 "ईडीचे करायचे काय खाली डोके वर पाय, भारतीय जनता पक्षाचा धिक्कार असो, हसन मुश्रीफ आगे बढो हम तुम्हारे साथ है" अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात माजी उपमहापौर परीक्षेत पन्हाळकर, स्थायी समितीचे माजी सभापती रमेश पोवार, संदीप कवाळे, करवीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मधुकर जांभळे, माजी नगरसेवक  अनिल कदम, महेश बराले, सतीश लोळगे, प्रकाश गवंडी, विनायक फाळके, तौफिक मुलानी, सुनील देसाई, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, सुहास साळोखे, दुर्वास कदम, राजू साबळे, महेश उत्तुरे, संपतराव चव्हाण पाटील, दिग्विजय मगदूम, जहिदा मुजावर, महादेव पाटील प्रसाद उगले, रियाज कागदी संजय पडवळे, शितल तिवडे, बाबा जगताप आदींचा सहभाग होता.