+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ?
Screenshot_20240226_195247~2
schedule15 Jan 23 person by visibility 1100 categoryक्रीडा
संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेतील गत उपविजेता आणि यंदाचा राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत विजेता पश्चिम बंगाल संघाने दर्जेदार खेळाचे प्रदर्शन घडवत यजमान महाराष्ट्र संघावर २ विरुध्द १ गोलने विजय मिळवला. पश्चिम बंगाल संघ ग्रुप फोर मध्ये अव्वल ठरल्याने संतोष ट्रॉफी च्या अव्वल साखळी स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. महाराष्ट्र संघाला गोल फरकाच्या आणि गुणांच्या आधारे अंतिम साखळी स्पर्धेसाठी अजूनही जाण्याची संधी आहे. महाराष्ट्र फुटबॉल संघाने कडवी झुंज दिली पण पराभव झाल्याने मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या फुटबॉल शौकिनांची निराशा झाली.
येथील शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतील ग्रुप चार मधील सामने खेळवण्यात आले. आज रविवारी स्पर्धेतील शेवटचा सामना महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल संघात झाला. दोन्ही संघांना ग्रुप चार मध्ये प्रथम क्रमांकासाठी विजय आवश्यक होता. पश्चिम बंगालचा संघ तुल्यबळ असला तरी महाराष्ट्र संघाने तीनही सामने जिंकत ग्रुपमध्ये अव्वल ठरण्यासाठी पात्रता सिद्ध ठेवली होती.
पश्चिम बंगालचे शॉर्ट पासिंग खेळाद्वारे सुत्रबद्ध चढायाद्वारे महाराष्ट्रावर वर्चस्व मिळवले. सामन्याच्या आठव्या मिनिटाला सुरजीत हन्सदाने मैदानी गोल करत बंगालला आघाडीस नेले. परतफेडीसाठी महाराष्ट्राने चढायाचा वेग वाढवला. त्यांचे गोल नोंदवण्याचे दोन प्रयत्न अफलातून होते. सामन्याच्या ३९ व्या मिनिटाला दीपक कुमारने गोल करत बंगालला आघाडीवर नेले. मध्यंत्तरास बंगाल संघ २-० असा आघाडीवर होता.
उत्तरार्धात महाराष्ट्राने गोलफरक कमी करण्यासाठी वेगवान चढाया केल्या. पण बंगालच्या बचाव फळीने त्या उधळून लावल्या. ७८ व्या मिनिटाला महाराष्ट्राचा फॉरवर्ड अरिफ शेखने मैदानी गोल करत महाराष्ट्राच्या आशा पल्लवीत केल्या. बरोबरी साधण्याची शर्थीने प्रयत्न केला. पण बंगालने बॉल जास्तीत जास्त आपल्याकडे ठेवत बचाव केला. एक गोलची आघाडी कायम टिकवत पश्चिम बंगालचे सामना जिंकला. सकाळच्या सत्रात झालेल्या पहिल्या सामन्यात हरियाणाने दीव दमण संघाचा ४ विरुद्ध ० गोलने पराभव केला. हरियाणाकडून दिनेश कडियनने दोन तर अजय आणि जिवेशने प्रत्येकी एक गोल केला. मध्यप्रदेश आणि छत्तीसगड यांच्यातील सामना २-२ असा बरोबरीत राहिला. मध्यप्रदेशकडून ईशांत राठीने तर छत्तीसगडकडून अजितसिंग मरकमने प्रत्येकी दोन गोल केले.
महाराष्ट्र आणि बंगाल सामन्याचे उद्घाटन ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे सचिव शाजी प्रभाकरण यांच्या हस्ते आणि श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी विफाचे उपाध्यक्ष युवराज मालोजीराजे, विफाचे सचिव सॉल्टर वाझ, विफा महिला फुटबॉल संघाच्या अध्यक्षा मधुरिमाराजे, केएसएचे सचिव माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, नंदकुमार बामणे, संभाजीराव मांगोरे, भाऊ घोडके, नितीन जाधव, प्रा. अमर सासने, प्रदीप साळोखे आदी उपस्थित होते.