महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : नागपूर येथील क्रीडा संकुलमध्ये स झालेल्या राज्यस्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , कोल्हापूर संघाने अंतिम सामन्यात पुणे संघाचा प्रभाव करत प्रथम क्रमांक पटकावला. सतरा वर्षाखाली मुलांच्या स्पर्धेमध्ये उपांत्य सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलच्या संघाने नाशिक विभागाचा पराभव केला . अंतिम सामन्यात पुणे संघाचा पराभव करून राज्यात प्रथम क्रमांक मिळाला
विजेत्या संघास श्री शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील व प्रमुख प्रशिक्षक संदीप पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.