महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कुंभी-कासारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या या बँकेच्या २१ जागासाठी निवडणूक जाहीर झाली होती. माजी आमदार चंद्रदीप नरके व बँकेचे अध्यक्ष अजित नरके यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध करण्यात आली. संचालक मंडळात दहा नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे.
बँकेच्या निवडणुकीसाठी एकूण ७२ अर्ज दाखल होते. छाननीनंतर ३८ अर्ज पात्र ठरले. २६ मे रोजी अर्ज माघारीची मुदत होती. माजी आमदार नरके यांच्या मार्गदर्शनानुसार १८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. वीस जागांची निवडणूक बिनविरोध झाली. भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातील उमेदवार अपात्र झाल्याने एक जागा रिक्त झाली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप मालगावे होते.
नूतन संचालक मंडळ पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण गटातील प्रतिनिधी अरुण पाटील-कुडित्रे, आनंदा पाटील-सुळे, मारुती चौगुले-खेरवडे, रंगराव पाटील –कोलोली, प्रा. एस. पी. चौगले-वाकरे, बाबूराव पाटील – पाडळी खुर्द, प्रकाश देसाई – चिंचवडे, अजित नरके – बोरगाव, पंडित वरुटे –कसबा बीड, दत्तात्रय पाटील – यवलूज, प्रकाश काटकर –पाटपन्हाळा, हिंदुराव मगदूम – पुनाळ, रणजित पाटील –कोगे, प्रदीप नाळे- सांगरुळ, कृष्णात वरुटे –बहिरेश्वर, कृष्णा पाटील – खुपिरे यांचा समावेश आहे. महिला राखीव प्रतिनिधी गटात ललिता सदाशिव बाटे – स्वयंभूवाडी, रेखा सुरेश पाटील –पोहाळे हे संचालक आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातून दत्तात्रय कांबळे तर इतर मागासवर्गीय गटातून आनंदराव माने – माजगाव हे संचालक आहेत.