महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
कदमवाडी-भोसलेवाडी परिसरातील एका शाळेतील शिक्षकांवर दोघांनी कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात शिक्षक संजय सुतार (रा.वरणगे पाडळी, या.करवीर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
कदमवाडी भोसलेवाडी परिसरात सुसंस्कार शिक्षण संस्थेची ॓माझी शाळा ॔ असून या शाळेत संजय सुतार गेली 25 वर्षे अध्यापनाचे काम करतात. सोमवारी (२६ डिसेंबर) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दोन व्यक्तींनी सुतार यांना शाळेच्या बाहेर बोलावून घेतले. त्यांची दुचाकी ढकलली होती. शिक्षक सुतार हे दुचाकी उचलत असताना त्यांच्यावर कोयत्याने वार झाले. एक वार मानेवर बसलेला आहे. हल्लेखोर हे माजी विद्यार्थी असल्याची माहिती पुढे आली आहे. पण पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. जखमी सुतार यांना एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले आहे. या घटनेने माझी शाळेत एकच खळबळ उडाली असेल विद्यार्थी भयभीत झाले आहेत.