+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा ! adjustदूध वाढीसाठी कुशिरेचं पुढचं पाऊल, करनाल, कोलारमधून आणले पशुधन adjustचेतन नरकेंची निवडणुकीतून माघार ! भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पाऊल मागे !! adjustहॅटस ऑफ, यूपीएससीत कोल्हापूरच्या तिघांचे यश
Screenshot_20240226_195247~2
schedule19 May 23 person by visibility 402 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर ' 
 केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत शहरातील कोळेकर तिकटी ते पाण्याचा खजिना या रस्त्याच्या दोन्ही बाजूने पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम रविवारी २१ मे पासून सुरू करण्यात येणार आहे. हे काम साधारणत: आठ ते दहा दिवस सुरू राहणार आहे. या रस्त्यावर दोन्ही बाजूने पाईपलाईन टाकावी लागणार असल्याने या कामासाठी हा रस्ता पुर्णत: बंद करण्यात येणार आहे. 
 या रस्त्यावरील दैनंदिन वाहतूक शहर वाहतूक शाखेच्या मार्गदर्शनाखाली खबरदारीचा उपाय म्हणून वळविण्यात आली आहे. संभाजीनगरकडून मिरजकर तिकटीकडे येणारी वाहतूक नंगीवली चौका कडून लाड चौक ते महाद्वार रोड या मार्गाने जातील. तसेच वारे वसाहत, महादेव मंदीर, पद्मावती चौक ते मंगेशकर नगर मार्गे गोखले कॉलेज चौक या मार्गानेही वाहतूक होईल.
 मिरजकर तिकटीकडून संभाजीनगरकडे जाणारी वाहतूक मिरजकर तिकटी ते खरी कॉर्नर ते लाड चौक ते पाण्याचा खजिना आणि मिरजकर तिकटी ते केशवराव भोसले नाट्यगृह ते रावणेश्वर मंदिर ते गोखले कॉलेज चौक या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तरी सर्व नागरीकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.