+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा ! adjustदूध वाढीसाठी कुशिरेचं पुढचं पाऊल, करनाल, कोलारमधून आणले पशुधन adjustचेतन नरकेंची निवडणुकीतून माघार ! भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पाऊल मागे !! adjustहॅटस ऑफ, यूपीएससीत कोल्हापूरच्या तिघांचे यश
Screenshot_20240226_195247~2
schedule29 Jan 23 person by visibility 876 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
शाहू छत्रपती केएसए वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात खेळाडू आणि समर्थकांमध्ये झालेल्या राड्याची पोलिस प्रशासनाने गंभीर दखल करत शिवाजी तरुण मंडळ आणि प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या खेळाडू आणि हुल्लडबाज समर्थकांवर गुन्हे दाखल करत कडक पावले उचलली आहेत. शिवाजी तरुण मंडळाचे आठ आणि प्रॅक्टिसचे नऊ खेळाडूंसह अनोळखी ५० समर्थकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनेने फुटबॉल वर्तुळात खळबळ उडाली आहे. 
  शनिवारी शाहू स्टेडियमवर शिवाजी आणि प्रॅक्टिस या पारंपरिक विरोधी संघामध्ये सामना झाला. या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी धुसमुसळा खेळ करत मैदानावर मारामारी केली. त्याचे पडसाद समर्थकांत उमटले. हुल्लडबाज समर्थकांवर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. पोलिसांनी मैदानावरील तणाव आणि हुल्लडबाजीची दखल घेताना शनिवारी मध्यऱात्री शिवाजी आणि प्रॅक्टीस संघातील खेळाडू आणि समर्थकांवर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी शिवाजी तरुण मंडळाच्या रोहन आडनाईक, योगेश कदम, संदेश कासार, ऋतुराज सूर्यवंशी, विक्रम शिंदे, संकेत साळोखे, मयुरेश चौगुले, करण चव्हाण बंदरे या खेळाडूंसह २५ हुल्लडबाज समर्थकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच प्रॅक्टीसचे खेळाडू अर्जुन साळुंखे, संकेत जाधव, सागर चिले, राहूल पाटील, सचिन गायकवाड, ओकार जाधव, सागर पवार, अदित्य पाटील, अमित बिस्वास यांच्यासह २५ हुल्लडबाजांवर गुन्हा दाखल केला आहे.