+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश
Screenshot_20240226_195247~2
schedule31 Dec 22 person by visibility 719 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : लव्ह जिहाद, गोहत्या आणि धर्मांतरण बंदीबाबत कायदे करावेत यासाठी सकल हिंदू समाजातर्फे रविवारी ( एक जानेवारी २०२३) कोल्हापुरात जनआक्रोश मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी होणार आहेत अशी माहिती संयोजक श्रीकांत पोतनीस, सुधीर वंदूरकर शांतीभाई लिंबाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान  श्री छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टने भवानी मंडप येथे मोर्चाच्या समारोपासाठी  जागा देण्यास नकार दिल्याचे संयोजकांना कळविले आहे. 
  "मोर्चाच्या समारोपासाठी भवानी मंडपातील जागा देण्यास श्री छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टकडे परवानगी मागितली होती. मात्र ट्रस्टने मोर्चाच्या समारोपासाठी भवानी मंडप येथे परवानगी नाकारली‌. यामुळे ट्रस्टचि निषेध करत असल्याचे " मोर्चाचे संयोजक महेश जाधव, बंडा साळुंखे, किशोर घाटगे आदींनी सांगितले. मोर्चाचा समारोप आता भवानी मंडप कमानी बाहेरील रस्त्यावर अजब पुस्तकालय समोरील जागेत होईल" असे संयोजकांनी सांगितले.मोर्चाविषयी सांगताना  ते म्हणाले, "बिंदू चौक येथून सकाळी दहा वाजता ध्वजपूजनाने मोर्चाला सुरुवात होईल. बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी शिवाजी चौक ते भवानी मंडप कमान समोर असा मोर्चा निघणार आहे. पत्रकार परिषदेला उदय भोसले, मधुकर नाझरे, शिवानंद स्वामी, राहुल कदम, सौरभ निकम, अजित पाटील, सुरेश रोकडे, उत्तम सांडुगडे, भवन पटेल आदी उपस्थित होते.