+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ?
Screenshot_20240226_195247~2
schedule22 Jan 23 person by visibility 337 categoryक्रीडा
जयसिंगपूरच्या दिव्या व दिशा पाटील भगिनी द्वितीय स्थानावर
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  शिवाजी पार्कमधील मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात आंतरभारती शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या "आंतरभारती चषक" खुल्या पंधरा वर्षाखालील मुला मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात झाली. कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धेत सांगली जयसिंगपूर इचलकरंजी व स्थानिक कोल्हापूर येथील नामवंत ११० बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत यामध्ये १८ बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुनांकन प्राप्त आहेत.या स्पर्धेचे उद्घाटन आंतरभारती शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षा व उद्योजिका पल्लवी कोरगावकर व संस्थेचे उपाध्यक्ष जिनरत्न रोटे यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले.यावेळीेचे संस्थेचे सचिव,एम एस पाटोळे,स्पर्धा संयोजक भरत शास्त्री,मुख्याध्यापक नेहा कानकेकर, मुख्याध्यापक संजय सौदलगे, समन्वयक संध्या वाणी, क्रीडा प्रमुख दगडू रायकर, क्रीडा शिक्षक समीर जमादार, राजेंद्र बनसोडे व सदाशिव र्हाटवळ, आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले,मनीष मारुलकर,आरती मोदी, रोहित पोळ व महेश व्यापारी उपस्थित होते.
स्पर्धेच्या सहाव्या फेरीनंतर चौथा मानांकित जांभळीचा अभय भोसले सहा गुणासह आघाडीवर आहे तर अग्रमानांकित जयसिंगपूरची दिव्या पाटील व द्वितीय मानांकित दिशा पाटील या जुळ्या बहिणी साडेपाच गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.ईश्वरी जगदाळे सांगली, शौर्य बगाडिया इचलकरंजी, व्यंकटेश खाडे पाटील कोल्हापूर, शंतनु पाटील कोल्हापूर , आराध्य ठाकूर देसाई इचलकरंजी व महिमा शिर्के कोल्हापूर हे सहा जण पाच गुणांसह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत.