+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही !
Screenshot_20240226_195247~2
schedule25 Sep 22 person by visibility 392 categoryक्रीडा
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
 येथील जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या हॉलमध्ये , कोल्हापूर चेस अकॅडमी आयोजित वरिष्ठ महिला जिल्हा संघ निवड बुद्धिबळ स्पर्धेत आग्रमानांकित जयसिंगपूरची दिव्या पाटीलने अंतिम पाचव्या फेरीत कोल्हापूरच्या महिमा शिर्केचा पराभव करून पाच पैकी चार गुण मिळवून सरस टायब्रेक गुणाधारे अजिंक्यपद पटकावले.
कोल्हापूरच्या शर्वरी कबनूरकरने मानांकित जयसिंगपूरच्या दिशा पाटीलला पराभवाचा धक्का देत चार गुणासह उपविजेतेपद मिळविले. पराभूत दिशा पाटील ला साडेतीन गुणासह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.कोल्हापूरची तृप्ती प्रभूने कोल्हापूरच्या सृष्टी कुलकर्णीचा वर विजय मिळवून साडेतीन गुणासह चौथे स्थान प्राप्त केले.कोल्हापूरची महिमा शिर्के व नांदणीच्या संस्कृती सुतारने अनुक्रमे पाचवे व सहावे स्थान मिळविले. पहिल्या सहा क्रमांकांना रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
 उत्तेजनार्थ बक्षिसे :- सात वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू सांची चौधरी इचलकरंजी व अकरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू अरिना मोदी, कोल्हापूर,सिद्धी बुबने जयसिंगपूर.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ विरासात फाउंडेशनच्या ज्येष्ठ रंगकर्मी प्रसाद जमदग्नी,शिल्पा पुसाळकर,प्राध्यापक मीना ताशेलदर व जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या उप जिल्हा प्रमुख स्मिता सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, मनीष मारुलकर, धीरज वैद्य, प्रीतम घोडके आरती मोदी व राजेंद्र मकोटे उपस्थित होते.
आठ ते बारा आॅक्टोबर दरम्यान औरंगाबाद येथे होणाऱ्या वरिष्ठ महिला राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला कोल्हापूर जिल्ह्याचा संघ पुढीलप्रमाणे 1) दिव्या पाटील जयसिंगपूर 2) शर्वरी कबनूरकर कोल्हापूर 3) दिशा पाटील जयसिंगपूर 4) तृप्ती प्रभू कोल्हापूर.