+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!! adjustगोकुळमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustडीवाय पाटील फार्मसीतर्फे रविवारी मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह adjustछत्रपतींच्या सुनेच्या मोटारीचे कुपेकरांच्या कन्येने केले सारथ्य adjustकोल्हापूरसाठी २३ ! हातकणंगलेसाठी २७ उमेदवार लढणार !! adjustनरेंद्र मोदींची २८ एप्रिलला कोल्हापुरात जाहीर सभा ! राजेश क्षीरसागरांची माहिती
Screenshot_20240226_195247~2
schedule11 Nov 22 person by visibility 504 categoryगुन्हे
आंतरजातीय प्रेम विवाह करणाऱ्या बहिण व पतीचे खून प्रकरण
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
बहिणीने आंतरजातीय प्रेम विवाह केल्याच्या रागातून बहीण व तिच्या पतीचा खून करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस पी गोंधळेकर यांनी अजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. गणेश महेंद्र पाटील (वय 25 ) आणि जयदीप महिंद्र पाटील (वय 24 दोघे रा. थेरगाव ता. शाहूवाडी) अशी शिक्षा झालेल्या दोघा भावांची नावे आहेत. या गुन्ह्यात मदत करणारा त्यांचा मित्र नितीन रामचंद्र काशीद (वय 27) याला कोर्टाने साडेतीन वर्षे सक्त मजुरी शिक्षा दिली. दोघा भावांनी बहीण मेघा कुलकर्णी (वय 20 ) तिचा पती श्रीकांत कुलकर्णी (वय 23) यांचा खून केला होता. 2015 मध्ये झालेल्या घटनेने सैराट चित्रपटाची आठवण झाली होती.
या खटल्याची हकीकत अशी की, मेघा आणि इंद्रजीत यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. या प्रेम विवाहाला मेघाच्या घरच्यांचा विरोध असल्याने दोघांनी गाव सोडले होते आणि ते कोल्हापुरात राहत होते. कोल्हापुरात ते कसबा बावडा येथील गोळीबार मैदान गणेश कॉलनी येथे भाड्याने राहत होते. मेघा ही डी मार्ट मध्ये नोकरी करत होत. लग्नानंतर तब्बल एक वर्षांनी डी मार्ट मध्ये मेघा आणि तिचा भाऊ जयदीप पाटील यांची भेट झाली. यावेळी जयदीपने आंतरजातीय विवाह केल्याबद्दल बहीण मेघाकडे नाराजी व्यक्ती केली होती. बहिणीने आंतरजातीय प्रेम विवाह केल्यामुळे गावांमध्ये दोघा भावांची चेष्टा केली जात असे. त्यामुळे त्यांच्या मनात बहिणी विषयी राग होता. त्या रागातून त्यांनी बहिणीचा खून करण्याचा कट रचला. त्यासाठी मित्र नितीन काशीद याचीही मदत घेतली.
 16 डिसेंबर 2015 रोजी नितीन काशीद यांच्या गाडीवरून गणेश आणि जयदीप हे दोघे भाऊ बहिण मेघा रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तिच्या घरी गेले. यावेळी मेघाचा पती इंद्रजीत उपस्थित होता. दोघांनी बहिणीला चहा करण्यास सांगितले. घरी दूध नसल्याने दूध खरेदीसाठी इंद्रजीत घराबाहेर पडला. इंद्रजीत घराबाहेर पडल्यानंतर न दोघा भावांनी बहीण मेघावर चाकूने वार केले. तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला आणि पुन्हा चाकूने वार केले. ती मयत झाल्यावर तिचा मृतदेह मोरीत ठेवला. दूध खरेदी करून इंद्रजीत घरी आल्यावर दोघा भावांनी त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. अचानक झालेल्या हल्ल्याने इंद्रजीत ओरडू लागला. इंग्रजीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून घर मालकिन वंदना प्रभाकर माधव या मेघाच्या घरी आल्या. त्यांना धक्का मारून दोघे भाऊ मोटरसायकलवरून पळून गेले. वंदना माधव खून खून म्हणून मोठ्याने ओरडू लागल्या. परिसरातील नागरिक जमा झाले. या घटनेची माहिती करतात परिसरात मोठी गर्दी झाली. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तत्कालीन पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी खुनाचा गुन्हा नोंद केला. तिघा संशयतांना अटक केली आणि कोर्टात आरोप पत्र सादर केले.
या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस के जाधव यांच्यापुढे झाली. त्यांची बदली झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश एसपी गोंधळेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी 16 साक्षीदार तपासले. प्रत्यक्ष पुरावा ,साक्षीदार आणि यापूर्वी झालेल्या खटल्यांचे निवेदन आणि सरकारी वकील शुक्ल यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून कोर्टाने गणेश आणि जयदीप पाटील या दोघां भावांना आजन्म कारावासाची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला त्यांना मदत करणाऱ्या नितीन काशीद याला साडेतीन वर्षाची शिक्षा ठोठावली.