अंतरंग हॉस्पिटलचा अपोलो हॉस्पिटल्सशी करार, कोल्हापूरच्या मेडिकल टुरिझमला गती - डॉ .विवेकानंद कुलकणी
schedule01 Nov 25 person by visibility 52 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्रीय पातळीवर कार्यरत यकृत आणि स्वादुपिंडाच्या आजारच्या निदान आणि उपचारा साठी तसेच लिवर प्रत्यारोपणा उपचारात अग्रेसर असलेल्या अपोलो हॉस्पिटल्सने, कोल्हापुरातील अंतरंग हॉस्पिटल संयुक्त उपचार - कामासाठी करार केला आहे. यामुळे कोल्हापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र उत्तर कर्नाटक गोवा आणि कोकणातील रुग्णांची मोठी सोय होणार आहे. या करारातंर्गत आता अपोलो हॉस्पिटल्स मधील तज्ञ अपोलो हॉस्पिटल्सचे डॉ. रवी शंकर, डॉ. अमेय सोनवणे, डॉ. केतुल शाह, डॉ. अमृत राज यांच्यासह अंतरंग हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. विवेकानंद कुलकर्णी आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. आदित्य कुलकर्णी यांची मोलाची साथ मिळणार आहे.
अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबईतील वैद्यकीय सेवाचे संचालक डॉ. रवी शंकर म्हणाले की, "यकृताच्या आजाराची लक्षणे बर्याचदा सुरुवातीला दिसत नाहीत, मात्र प्रगत अवस्थेत गंभीर लक्षणे दिसून येतात. कोल्हापूरमधील स्पेशालिस्ट ओपीडीद्वारे आणि ‘अंतरंग’मध्ये गुंतागुंतीच्या प्रकरणांसाठी असलेल्या शस्त्रक्रियांच्या तज्ज्ञांच्या माध्यमातून आम्ही रुग्णांना वेळेवर, तज्ज्ञांकडून सखोल मूल्यांकन आणि योग्य उपचार मिळावेत यासाठी प्रयत्नशील आहोत. अपोलो हॉस्पिटल्समध्ये अत्याधुनिक यकृत प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध असल्यामुळे या उपक्रमाद्वारे लवकर निदानापासून शस्त्रक्रिया व्यवस्थापन तसेच दीर्घकालीन रोगमुक्ततेपर्यंत अविरत व सातत्यपूर्ण उपचार प्रदान केले जातात.
डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांनी अपोलो हॉस्पिटल्स आणि अंतरंग हॉस्पिटल मधील भागीदारी ही महानगरातील प्रगत वैद्यकीय सेवा, कोल्हापूर आणि आसपासच्या शहरांमध्ये तत्परतेने पोहोचवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे.त्यामुळे मेडिकल टुरिझमला गती येईल असे सांगितले. यावेळी वरिष्ठ समन्वयक प्रशांत शेलार उपस्थित होते.