+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही !
Screenshot_20240226_195247~2
schedule18 Jan 23 person by visibility 274 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  
 डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटल कदमवाडी येथे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या देणगीतून उभारलेल्या अत्याधुनिक ‘शिशु रक्षा’ या नवजात शिशु विभागाचे उद्घाटन बुधवारी झाले.   इंडियन अकाडमी ऑफ पेडीयाट्रीक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. व्ही. बसवराज व डीवायपी ग्रुपचे प्रमुख डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
रोटरी सनराईजच्या वतीने उभारण्यात आलेल्या 'शिशु रक्षा' विभागात दाखल होणाऱ्या सर्व नवजात बालकांवर मोफत उपचार करण्याची घोषणा डॉ संजय पाटील यांनी केली. 
यावेळी बोलताना डॉ पाटील म्हणाले, रोटरी सनराईजचे नेहमीच सहकार्य मिळत आले आहे. हॉस्पिटलच्या माध्यमातून नेहमीच गोरगरिबांना वैद्यकीय सुविधा आम्ही देत आलो आहोत व यापुढेही देऊ. रोटरीच्या माध्यमातून मिल्क बँक उभारणीसाठी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ बसवराज म्हणाले, डी वाय पाटील मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून उत्तम डॉक्टर घडवण्याचे काम सुरु आहे. या जगात नव्याने पाऊल टाकणाऱ्या मुलांसाठी हा शिशु रक्षा विभाग मोठी जबाबदारी पार पाडेल याची खात्री आहे. यावेळी सचिन मालू , पंकज शहा याांचे भाषण झाले.
यावेळी डीस्ट्रीक गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे, अध्यक्ष हृषीकेश खोत, डी वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, गौरीश धोंड, राहुल कुलकर्णी, दिव्यराज वसा व डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार व्यासपीठावर उपस्थित होते. 
यावेळी राहुल कुलकर्णी यांनी शिशु रक्षा विभाग व तेथे उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची माहिती दिली. अर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉ एस. ए. लाड यांनी स्पाइन विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या सुविधांची माहिती दिली.यावेळी बोलताना पंकज शहा यांनी ग्रामीण भागासाठी अशी नवजात शिशु साठी सुविधा उपलब्ध करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी रोटरी सनराईज क्लब कोल्हापूरचे ,सचिव दिव्यराज वसा,नासिर बोरसदवाला, शरद पै, अरुण भंडारे, राहुल कुलकर्णी, राजेश साळगावकर,सुभाष कुत्ते, करुणाकर नायक, सचिन झंवर, विक्रांत कदम, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव डॉ व्ही. व्ही. भोसले, श्रीधर स्वामी, अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, वैदयकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, प्राचार्य डॉ महादेव नरके, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील उपस्थित होते