+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश
Screenshot_20240226_195247~2
schedule28 Jan 23 person by visibility 253 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
तब्बल आठ दिवसानंतरच्या विश्रांतीनंतर सुरू झालेल्या शाहू छत्रपती केएसए वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळ आणि प्रॅक्टिस फुटबॉल क्लबमधील खेळाडूंमध्ये मैदानावर राडा झाला. पंचानी दोन खेळाडूंना रेड कार्ड दाखवून राडा करणाऱ्या खेळाडूंना मैदानावरुन बाहेर घालवले. मैदानावरील राड्याचे पडसाद फुटबॉल समर्थकात उमटल्याने सामना संपल्यावर हुल्लडबाजी आणि गोंधळ उडाल्याने मैदानात आणि मैदानावर तणाव निर्माण झाला. हुल्ल्डबाज खेळाडू आणि समर्थकावर कारवाईचे संकेत पोलिस प्रशासनाने दिले आहेत.
 पारंपरिक विरोधक असलेल्या शिवाजी आणि प्रॅक्टीस यांच्यातील सामनासाठी पोलीसांचा मैदानावर आणि मैदानाबाहेर मोठा बंदोबस्त होता. पण मैदानावरील खेळाडूंच्या वर्तनाने श्रीमंत शाहू महाराजांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या शाहू छत्रपती केएसए वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेला गालबोट लागले. सामन्यात झालेल्या गैरप्रकारचा निषेध करण्यासाठी शिवाजी पेठेतील संघ, तालमीच्यावतीने उद्या रविवारी सकाळी ११ वाजता गांधी मैदान पॅव्हेलियन येथे बैठक आयोजितही केली आहे.
 सामन्यात दोन्ही संघाचे खेळाडू सातत्याने एकमेकाच्या अंगावर धाऊन जात होते. सामन्याच्या ३५ व्या मिनिटाला राहूल पाटीलने मारलेल्या वळणदार कॉर्नरवर प्रॅक्टिसच्या ज्युलियस स्ट्रो याने हेडद्वारे गोल करत संघाला आघाडीवर नेले. हीच आघाडी प्रॅक्टिसने मध्यंत्तरापर्यंत कायम टिकवली. उत्तरार्धात दोन्ही संघानी वेगवान खेळ केला. त्याला धुसमुसळ्या खेळाची जोड मिळाल्याने मैदानावर तणाव वाढला. संघातील खेळाडू एकमेकांच्या अंगावर धाऊन गेले. खेळाडूंमध्ये मारामारी सुरू झाल्यावर त्याचे पडसाद फुटबॉल समर्थकात उमटले. दोन्ही संघाच्या समर्थकांनी घोषणा देत एकमेकांना आव्हान दिले. पण पोलिसांनी प्रेक्षकागृहातील परिस्थिती शांततेत हाताळली. मैदानावर गैरवर्तन केल्याप्रकरणी मुख्य पंचांनी प्रॅक्टिसच्या राहूल पाटील तर शिवाजीच्या संकेत साळोखेला रेड कार्ड दाखवल्याने दोघांना मैदानाबाहेर काढले. पूर्णवेळेत एक गोलची आघाडी ठेवत प्रॅक्टीसने १-० असा सामना जिंकत तीन गुणांची कमाई केली.
सामना संपल्यावर दोन्ही संघात पुन्हा घोषणायुद्ध सुरू झाले. समर्थकांनी पाण्याच्या बाटल्या मैदानावर भिरकावल्या. मैदानाबाहेरही मोठ्या संख्येने समर्थक रस्त्यांवर उतरल्यावर काही काळ पळापळी झाली. पण पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. खेळाडूंच्या मैदानातील वर्तनामुळे त्याचे पडसाद उमटत असल्याने खेळाडूंवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत पोलिस प्रशासनाने दिले आहेत.
दरम्यान आज झालेला फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ आणि उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यातील सामना शून्य गोल बरोबरीत सुटला.