ठेकेदार शैलेश उदयसिंह भोसले यांना कामाच्या दिरंगाईबद्दल २४ हजार दंड
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : रस्ता दुरुस्ती, गटर बांधकामच्या निविदा भरायच्या. कामाचा ठेका घ्यायचा पण मुदतीत कामाला सुरुवात करायची नाही. कामात चालढकल करणाऱ्या 39 ठेकेदारांना महापालिका प्रशासनाने नोटीसा काढले आहेत. तसेच एका ठेकेदाराला दंडात्मक कारवाई केली आहे. मुदतीत काम चालू केले नसलेने ठेकेदार शैलेश उदयसिंह भोसले यांनी यांना कामाच्या दिरंगाईबद्दल विलंब आकार म्हणून २४ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. महापालिकेच्या छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक ३३ महालक्ष्मी मंदीर या प्रभागातील जामदार वाडा मोमीन ग्लास सेंटर, सोडा कॉर्नर, ताईबाई गल्ली, शायरन फुटबॉल ग्रुप डॉ पाटील बोळ घर ते शिंदे घर या परिसरात गटर व पॅसेज काँक्रिटीकरण करणेचे काम ठेकेदार शैलेश उदयसिंह भोसले यांच्या नावे मंजूर आहे. या कामाचा कार्यादेश १५ फेब्रुवारी २०२२ रोजी ठेकेंदार यांना देण्यात येऊन या कामास १८० दिवस मुदत दिलेली आहे. ठेकेदार भोसले यांनी मुदतीत काम चालू केले नाही. त्यांना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी २४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याच्या सूचना उप-शहर अभियंता यांना दिल्या. त्याप्रमाणे विभागीय कार्यालयने ठेकेदार भोसले यांच्या बिलातून विलंब आकार इतकी २४ हजार रुपयांची कपात केले. त्याचबरोबर महापालिकेकडील ११९ कामासाठी ३९ ठेकेदारांना मुदतीत काम चालू केले नसल्याने नोटीस बजावण्यात आल्या आहेत.