+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही !
Screenshot_20240226_195247~2
schedule25 Jan 23 person by visibility 593 categoryजिल्हा परिषद
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रणजीत पाटील तर हाय चेअरमनपदी मुजमिल अहमद नावळेकर यांची निवड झाली. सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी संचालक मंडळाची बुधवारी बैठक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. चेअरमनपदी निवड झालेले रणजीत पाटील चतुर्थश्रेणी सेवेत परिचर आहेत. सोसायटीमध्ये पहिल्यांदाच चेअरमनपदी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना संधी मिळाली आहे. व्हाईस चेअरमन नावळेकर हे बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता आहेत
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या सभागृहात त नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा झाला. सुकाणू समितीचे मार्गदर्शक विलास साबळे, सत्ताधारी आघाडीचे प्रमुख नेते व सोसायटीचे माजी चेअरमन एम. आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. यावेळी सभासदांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
 " गेल्या चौदा वर्षांमध्ये जिल्हा परिषद सोसायटीत काम करत असताना संस्थेच्या विकासाचा प्लॅटफॉर्म तयार झाला आहे. स्वच्छ व पारदर्शी कारभार आहे. नूतन संचालक व पदाधिकाऱ्यांनी सोसायटीच्या विकासाचा राजमार्ग तयार करावा"अशी अपेक्षा मावळते चेअरमन राजीव परीट यांनी व्यक्त केले. याप्रसंगी आघाडीतील प्रमुख नेतेमंडळी व शिक्षक नेते राजाराम वरुटे, ज्योतीराम पाटील, कृष्णात कारंडे, शिक्षक बँकेचे संचालक एस. व्ही. पाटील, ग्रामसेवक संघटनेचे के. आर. किरुळकर साताप्पा मोहिते, आरोग्य संघटनेचे एम. एम. पाटील, माजी व्हाईस चेअरमन दिनकर तराळ, ग्रामसेवक संघटनेचे एल.एस.दिगे, अजित मगदूम, किरण मगदूम, अनिल आवळेे फिरोज फरास, श्रीमती प्रतिभा शिर्के आदींचा सत्कार करण्यात आला. संचालक श्रीकांत चव्हाण व सोसायटीचे व्यवस्थापक व्ही.एल.बोरगे त्यांनी सूत्रसंचालन केले. संचालक महावीर सोळांकुरे यांनी आभार मानले.
   यावेळी संचालक अमर पांडुरंग पाटील, जितेंद्र वसगडेकर, राहुलराज शेळके, सुरेश पांडुरंग सुतार, रवींद्र क. जरळी, अजय शिंदे, सुनील पाटील, बाजीराव श्रीपती पाटील, सचिन गुरव, सरदार दिंडे, नंदीप मोरे, साताप्पा मगदूम, जयकुमार रेळेकर, सुधाकर कांबळे , उत्तम वावरे, सरोजिनी कोरी , सोनाली दत्तात्रय गुरव उपस्थित होते. सत्कारप्रसंगी बोलताना नूतन चेअरमन रणजीत पाटील म्हणाले, " सत्ताधारी आघाडीच्या पॅनेलप्रमुखांनी, संचालक व व सभासदांनी जो विश्वास दाखविला आहे तो सार्थ ठरवू. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला चेअरमन पदे काम करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली आहे याबद्दल मी साऱ्यांचे आभार मानतो. सोसायटीचा विकास आणखी वृद्धिंगत करू. सभासदांना कामकाजात कोणत्याही अडचणी उद्भवणार नाहीत. याची सदैव काळजी घेतली जाईल."