+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!! adjustगोकुळमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustडीवाय पाटील फार्मसीतर्फे रविवारी मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह adjustछत्रपतींच्या सुनेच्या मोटारीचे कुपेकरांच्या कन्येने केले सारथ्य adjustकोल्हापूरसाठी २३ ! हातकणंगलेसाठी २७ उमेदवार लढणार !!
Screenshot_20240226_195247~2
schedule23 May 23 person by visibility 195 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :   
जागतिक पातळीवर २८  मे हा दिवस मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. या वर्षीच्या जागतिक मासिक पाळी दिनाची संकल्पना "आम्ही कटिबध्द आहोत" ही आहे. या दिनाचे औचित्य साधून २२ ते २८ मे २०२३  या कालावधीत जिल्हयात मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती सप्ताह राबविण्यात येणार आहे.
 या सप्ताहात सर्वांनी सहभागी होवुन, स्वच्छता व आरोग्याबाबत जनजागृती करावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.  या जनजागृती सप्ताह कालावधीत महिला व किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीदरम्यान स्वच्छता व त्यांचे आरोग्य या बाबींना केंद्रस्थानी ठेवुन जनजागृती केली जाणार आहे. 
यामध्ये सर्व विभागांशी तसेच विविध घटकांचा समन्वय साधुन ही मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व ग्रामपंचायतींमधुन आशा वर्कस, अंगणवाडी कार्याकर्ती, अंगणवाडी सेविका, शिक्षिका, महिला बचत गट यांनी पुढाकार घेवुन मोठया प्रमाणात या सप्ताहानिमित्त मासिक पाळी व्यवस्थापन व आरोग्याची काळजी या विषयावर महिला व किशोर वयीन मुलींना माहिती देउन जनजागृती करावी असे म्हटले आहे