+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ?
Screenshot_20240226_195247~2
schedule15 Aug 22 person by visibility 273 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे हर घर तिरंगा व हर घर संविधान उपक्रम राबविण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृतमहोत्सव माणगावमध्ये विविध उपक्रमाद्वारे साजरा झाला.
 प्रतीकात्मक सरपंच म्हणून विधवा महिला सपना सुनील पाटील यांची निवड करण्यात आली. त्यांच्या हस्ते गांधी चौक येथील ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण झाले. आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते हर घर संविधान वाटपाच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. गावातील सर्व प्रभागातील प्राथमिक 50 नागरिकांना संविधान प्रतीचे वाटप केले. तसेच माणगाव गावातील वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या गावातील ७५ जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
सरपंच डॉ. राजू मगदूम यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी माजी आमदार सुजित मिणचेकर, प्रातांधिकारी विकास खरात,अप्पर तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, उपसरपंच अख्तरहुसेन भालदार, ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील, अभिजित घोरपडे, प्रकाश पाटील, नितीन कांबळे, मनोज आदाण्णा, अमरसिंह उपाध्ये, सुधाराणी पाटील, वसुधा बन्ने, सुनीता मगदूम, विद्या जोग, स्वप्निला माने, गीतांजली उपाध्ये, रमीजा जमादार, संध्याराणी जाधव, संघमित्रा माणगावकर, ग्रामविकास अधिकारी बी.बी.राठोड, गाव कामगार तलाठी जे.एम. पोवार, जवाहर कारखान्याचे संचालक जिनगोंडा पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, आय.वाय. मुल्ला, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील मन्ने, राजू सनदी, उपस्थित होते.